ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुका रद्द करा
By Admin | Updated: March 16, 2017 02:35 IST2017-03-16T02:35:00+5:302017-03-16T02:35:00+5:30
उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुका रद्द करून नव्याने निवडणुका घेण्यात याव्या,

ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुका रद्द करा
मोर्चा : बहुजन रोजंदारी कामगार संघटनेची मागणी
नागपूर : उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुका रद्द करून नव्याने निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणी बहुजन रोजंदारी कामगार संघटनेने केली असून या मागणीसाठी बुधवारी हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बसपाचे माजी प्रदेश सचिव सागर डबरासे व बहुजन रोजंदारी कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर उके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. संविधान चौक येथे कांशीराम यांना अभिवादन करण्यात आले. सागर डबरासे यांनी कांशीराम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अभिवादन सभेनंतर संविधान चौक ते जीपीओ चौकपर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी यांना मागण्यांचे निवेदन सोपविण्यात आले. बॅलेट पेपरद्वारे नव्याने निवडणुका घेण्याच्या मागणीसह पटवर्धन मैदान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची त्वरित निर्मिती करण्यात यावी, सार्वजनिक बांधकाम विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मोर्चामध्ये समदभाई कुरैशी, हेमलता मेश्राम, दीपक सहारे, सचिन तायड़े, अमरदीप दरवाड़े, नरेश जाभूलकर, बंडू शेंडे, कृष्णा दहिकर, गंगाधर शेंडे, रेखा वासनिक, रेहाना कुरैशी, वंदना मडावी, रंजना कोरचे, रेखा राऊत, कल्पना नायडू, कल्पना राऊत, नीता आगरकर, बंडू शेंडे, सुनीता परतेकी, गोवर्धन सोनुले, सुशीला डोंगरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)
कांशीराम यांना अभिवादन
बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालय, न्यू कैलासनगर येथे अभिवादन करण्यात आले. बसपाचे माजी प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वात अभिवादन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी विलास मुन, सुरेश ढेंगरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ सोनटक्के यांनी केले. वर्षाताई वाघमारे यांनी समारोप केला. यावेळी शामराव तिरपुडे, अजय धाबर्डे, प्रताप तांबे, विद्यार्थी शेवडे, जगदीश गेडाम, वैशाली शेवडे, अश्विनी रामटेके, पूजा शेवडे, लक्ष्मी रावले, लता शेवडे, ध्रुपता चोकटे, आस्था शेवडे, अर्हन्त तिरपुडे आदी उपस्थित होते.