शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डीबीटी रद्द करा : महिला व बाल कल्याण समितीने घेतला ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:21 IST

२०१९-२० या आर्थिक वर्षात ७० टक्के निधी डीबीटी व अन्य कारणाने खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे डीबीटी रद्द करण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देडीबीटीमुळे मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना ‘डीबीटी’च्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहत आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ७० टक्के निधी डीबीटी व अन्य कारणाने खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे डीबीटी रद्द करण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत घेण्यात आला.जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर सभापती व सदस्यांची निवड झाल्यानंतर पहिलीच समितीची सभा महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती उज्ज्वला बोढारे यांनी घेतली. जि.प.च्या शिक्षण, समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, कृषी या विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. पूर्वी या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना वस्तू स्वरुपात दिला जात होता. परंतु यामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा ठपका ठेऊन शासनाने या योजनेसाठी डीबीटी लागू केली. यानुसार प्रथम पात्र लाभार्थ्यांना साहित्याची खरेदी करुन त्याचे देयक संबंधित पंचायत समिती स्तरावर सादर केल्यानंतरच त्या साहित्याचे अनुदान बँक खात्यामध्ये वळते करण्यात येते. परंतु जेव्हापासून या योजनांवर डीबीटी लागू करण्यात आली, तेव्हापासून योजनेकडे लाभार्थ्यांनी पाठच फिरविल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहत आहे. वर्ष २०१९-२० मधील महिला बाल कल्याण विभागाचा जवळपास ३ कोटी ७५ लक्ष रुपये अखर्चित राहिले आहे. त्यामुळे डीबीटी रद्द करावी, असा ठराव समितीच्या सभेत एकमताने घेतल्याचे बोढारे यांनी सांगितले.याशिवाय या सभेमध्ये महिला व बाल कल्याणचा २४ जानेवारी २०१४ चा जीआरमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला. विभागातील रिक्त पदांची माहिती घेण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजना नाविन्यपूर्ण असाव्यात यावर सभेत चर्चा झाल्याचे बोढारेंनी यांनी सांगितले. विभागाची प्रथम सभा असल्यामुळे सर्व समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सभेला जि.प.सदस्या राधा अग्रवाल, ज्योती राऊत, पुनम जोध, सुचिता ठाकरे, अर्चना गिरी, निता वलके, माधुरी गेडाम व नीलिमा उईके यांच्यासह विभागप्रमुख भागवत तांबे उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदfundsनिधी