शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

वेगळ्या विदर्भासाठी आंदोलनाची हाक; नितीन गडकरींच्या कार्यालयाला घेराव घालण्याची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 12:13 IST

गडकरींच्या खामला भागातील कार्यालयाची सुरक्षा वाढविली

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा धगधगत आहे. विदर्भाचं स्वतंत्र राज्य असावं असं म्हटलं जात असले तरी, तसे होऊ शकले नाही. विदर्भाने अनेक नेते महाराष्ट्राला दिले. मात्र, विदर्भ राज्यासाठी या नेत्यांकडून हवा तसा पुढाकार मिळाला नाही. त्यामुळे विदर्भवाद्यांमध्ये नाराजीची भावना आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने यावरुन आक्रमक पवित्रा घेतला असून वेगळे विदर्भ राज्य व्हावे या मागणीने पुन्हा उचल खाल्ली आहे.

यंदाचे हिवाळी अधिवेशनाचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या मागणीसाठीचे आंदोलन करण्याची भूमिका विदर्भ राज्य समितीने घेतली आहे. तसेच, विदर्भातील खासदारांना जाहीरनामा मागण्यासाठी व त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन राजीनामा मागणे आंदोलन करण्यात येत आहे.

विदर्भातील खासदार व त्यांच्या पक्षाची विदर्भ राज्य निर्मितीबाबत काय भूमिका आहे, ती जाहीरपणे स्पष्ट करावी, असे  विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामन चटप यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. तर, आज याच मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाला घेराव टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रपुरात वामनराव चटप, नागपुरात अरुण केदार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलकांची भूमिका पाहता गडकरींच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

विदर्भ राज्य मिळवण्यासाठी आता आमचा 'आरपार' चा लढा - वामनराव चटप

नुकतच विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी वर्धा येथे बोलताना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाकरिता आरपारची लढाई सुरू झाली असून मिशन २०२३ संपेपर्यंत 'अभी नही तो कभी नहीं' या ईर्ष्येने आता हा लढा उभारला जाणार, असल्याचे म्हटले होते.

विदर्भवाद्यांनी घटनेतील कलम ३ प्रमाणे विदर्भ राज्य निर्मितीची जबाबदारी ही केंद्र सरकारची व संसदेची असल्यामुळे केंद्र सरकारबरोबरच विदर्भातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या १० ही खासदारांनी विदर्भ राज्य निर्मितीबाबत त्यांची व त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे, हे जाहीरपणे स्पष्ट करावे. याकरीता विदर्भातील १० ही खासदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील विदर्भवादी राज्याच्या आर्थिक स्थितीच्या पुराव्यासह पोस्टाद्वारे व इ-मेलद्वारे १० नोव्हेंबरपर्यंत पत्रव्यवहार करून त्यानंतर आंदोलन तीव्र करणार असल्याचे म्हटले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणVidarbhaविदर्भWamanrao Chatapवामनराव चटपNitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर