शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागाच्या १०१५ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:52 IST

मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूरजवळील पेंच प्रकल्पाच्या पाणी साठ्यात व सिंचनात झालेल्या घटीमुळे व पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना राज्याच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. जलसंपदा विभागाच्या १०१५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून सिंचनाचे धडक कार्यक्रम यामुळे राबविणे सोईचे होणार आहे.

ठळक मुद्देचौराईमुळे पेंचच्या पाण्यात झाली घट : धडक सिंचन कार्यक्रम राबवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूरजवळील पेंच प्रकल्पाच्या पाणी साठ्यात व सिंचनात झालेल्या घटीमुळे व पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना राज्याच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. जलसंपदा विभागाच्या १०१५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून सिंचनाचे धडक कार्यक्रम यामुळे राबविणे सोईचे होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी या उपाययोजनांना मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे नागपूर-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळणार आहे.चौराई धरणामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ६१५ दशलक्ष मीटर पाणी कमी झाले आहे. चौराई धरण होईपर्यंत २८ वर्षांपासून तोतलाडोह येथे उपलब्ध होणारे सर्व पाणी वापरण्यात येत होते. पिण्याचे पाणी व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. ६१५ दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट भरून काढण्यासाठी, सिंचनासंदर्भात उद्भवलेल्या गंभीर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कमी कालावधीत व दीर्घ कालावधीत पूर्ण होऊ शकणाऱ्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पालकमंत्री बावनकुळे यांनी जलसंपदा विभाग, कृषी विभाग, मनपा, एनटीपीस, वेस्टर्न कोल फिल्डस, महानिर्मिती यांच्यामार्फत होणाऱ्या  व्यवसायांचे प्रस्ताव मागविले होते. जलसंपदा विभागामार्फत शासनाच्या अखत्यारीतील व कमी कालावधीत पूर्ण होणाऱ्या  प्रस्तावीत तीन उपाययोजनांच्या माध्यमातून २६,३७० हेक्टर क्षेत्र पेंच नदीतून चौराई धरणामुळे उद्भवलेल्या ६१५ दशलक्ष घनमीटर पाणी तुटीमुळे अडचणीत आलेले सिंचनक्षेत्र हे कन्हान नदी, वैनगंगा नदी, नागनदी, व लाभक्षेत्रात उपलब्ध व प्राप्त होणाऱ्या  पाण्यापासून पुनर्स्थापित करण्यासाठी १०१५ कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर