लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जर मुलांचा 'स्क्रीन टाइम' आताच आटोक्यात आणला नाही, तर २०५० पर्यंत प्रत्येक दुसऱ्या शालेय मुलाला चष्मा लावावा लागेल, असा गंभीर इशारा अखिल भारतीय नेत्रतज्ज्ञ संघटनेचे (एआयओएस) अध्यक्ष डॉ. पार्थ बिस्वास यांनी दिला.
रविवारी आयोजित विदर्भऑप्थाल्मिक सोसायटीच्या (व्हीओएस) पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. व्ही. नरेंद्रन (अरविंद आय हॉस्पिटल, कोइम्बतूर) आणि डॉ. प्रशांत बावनकुळे (अध्यक्ष, एआरसी, एआयओएस) यांचीही विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. विरल शाह यांनी अध्यक्ष तर, डॉ. क्षमिक मोकादम यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
दर सहा महिन्यांनी बदलावा लागत आहे चष्मामायोपिया असलेल्या मुलांना दर सहा महिन्यांनी चष्मा बदलण्याची वेळ येत आहे. यामुळे त्यांचे खेळ, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यावर परिणाम होत आहे. 'एआयओएस'ने केंद्र सरकारकडे मोबाइल, टॅब आणि अन्य 'निअर व्हिजन डिव्हाइसेस'वरील वापरासाठी मार्गदर्शक नियम सुचवले आहेत. हे धोरण सरकारने लवकरात लवकर स्वीकारावे, म्हणजे अनेक मुलांचे डोळे वाचू शकतील.
जनजागृतीवर दिला जाणार भरडॉ. विरल शाह म्हणाले, मुलांमध्ये मायोपिया वाढू नये यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. विदर्भातील झपाट्याने बदलणाऱ्या ग्रामीण भागांतील आणि महापालिकेच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येईल.
२३ टक्के शालेय मुलांना मायोपियाडॉ. बिस्वास म्हणाले, कोविडनंतरच्या काळात मुलांमध्ये मायोपिया (दृष्टी कमी होणे, चषयाची गरज भासणे) झपाट्याने वाढत आहे. सध्या सुमारे २३ टक्के शालेय मुलांना मायोपिया आहे. ही संख्या २०५० पर्यंत ५३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.