हा ऊ स फु ल्ल खरेदी
By Admin | Updated: June 20, 2016 02:44 IST2016-06-20T02:44:56+5:302016-06-20T02:44:56+5:30
नव्या वर्गाच्या शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. बहुतांश शाळा शालेय साहित्य शाळेतूनच पुरवित असल्याने पुस्तके ....

हा ऊ स फु ल्ल खरेदी
उन्हाळ्याच्या सुट्या संपल्या. आता लगबग सुरु झाली ती शाळेची !
नव्या वर्गाच्या शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. बहुतांश शाळा शालेय साहित्य शाळेतूनच पुरवित असल्याने पुस्तके आणि स्टेशनरीच्या दुकानात पालकांची गर्दी कमी आहे. परंतु गणवेश, स्कूल बॅग, वॉटर बॅग यासारख्या आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी रविवारी शहरातील सीताबर्डी, महाल,गांधीबाग, धरमपेठ, जरीपटका, सदर येथील बाजारपेठात विद्यार्थी आणि पालकांची गर्दी उसळली आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तरावर महागाईचे ओझे वाढल्याने सर्वसामान्य पालकांच्या खिशाला कात्री मात्र बसते आहे. सीताबर्डी मुख्य मार्गावर शालेय साहित्याच्या या हाऊसफुल्ल खरेदीचा नजारा टिपला आहे आमचे छायाचित्रकार संजय लचुरिया यांनी.