शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बुटीबोरीत महाआरोग्य तपासणी शिबिर आज : ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:21 AM

समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार २६ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड वेल्फेअर सेंटर ६, जैन सहेली मंडळ, पी-६०, आर अ‍ॅन्ड सी झोन, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी इंडस्ट्रीयल परिसर, बुटीबोरी येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर सर्वांसाठी खुले असणार आहे. या शिबिराचा लाभ महिला, पुरुष व बालकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकमत व जैन सहेली मंडळाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार २६ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड वेल्फेअर सेंटर ६, जैन सहेली मंडळ, पी-६०, आर अ‍ॅन्ड सी झोन, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी इंडस्ट्रीयल परिसर, बुटीबोरी येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर सर्वांसाठी खुले असणार आहे. या शिबिराचा लाभ महिला, पुरुष व बालकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.लोकमत व जैन सहेली मंडळ, नागपूरद्वारा आयोजित या शिबिराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, बुटीबोरी यांचे सहकार्य मिळाले आहे. शिबिराचे उद्घाटन नागपूर आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर व लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत होईल.महिला व बालकांच्या सक्षमीकरणाचाच एक भाग म्हणून या भव्य नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात शासकीय दंत रुग्णालयाची चमू दंत विकारासोबत मुख कर्करोगाचीही तपासणी करील. यासाठी विशेष ‘डेंटल व्हॅन’ उपलब्ध असणार आहे. मेडिकल रुग्णालयाकडून नेत्र तपासणी, चष्म्याचे नंबर काढण्यापासून ते डोळ्यांचे आजार, हाडांचे आजार, बालकांचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महिलांचे आजार, त्वचेचे आजार, श्वसन व दम्याचे आजार, सामान्य आजार आदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासले जातील. शिबिरात विविध कर्करोग, सामान्य शस्त्रक्रिया तज्ज्ञ सहभागी होणार असल्याने या आजाराशी संबंधित रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाईल.हे शिबिर सर्वांसाठी असून रुग्णांची नोंदणी शिबिराच्या ठिकाणीच दुपारी १ वाजेपर्यंत होईल. बुटीबोरी व आजूबाजूच्या गावातील महिला, पुरुष यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत व जैन सहेली मंडळातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२९१५०३५, ९८८१७४९३९०, ९८२२४०६५६२ यावर संपर्क साधावा.शिबिरात या तज्ज्ञांचा असणार सहभागया शिबिरात महिला, पुरुष व बालकांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, कर्करोग तज्ज्ञ , नेत्ररोग तज्ज्ञ, नाक, कना व घसा तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, श्वसन रोग तज्ज्ञ आणि दंतरोग तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.स्तन कर्करोगाची विशेष तपासणीस्तनाच्या कर्करोगाचे शून्य ते पहिल्या स्टेजमध्येच निदान झाल्यास तो पूर्णत: बरा होऊ शकतो. यामुळे या शिबिरात उपकरणाद्वारे स्तन कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे.

  • दंत तपासणी करणाऱ्या लहान मुलांना टुथपेस्ट व ब्रश भेट म्हणून दिले जाईल

सखी मंच सदस्यांनीही घ्यावा लाभबुटीबोरीत होणाऱ्या या महाआरोग्य तपासणी शिबिरात महिलांसाठी विविध तपासण्या नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे या शिबिराचा लाभ लोकमत सखी मंच सदस्यांनीही घ्यावा, असे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे.या तपासण्या होतील

  •  हिमोग्लोबिन
  •  ईसीजी
  •  रक्तदाब
  •  रक्तातील साखरेचे प्रमाण
  •  अस्थमा
  •  चष्म्याचे नंबर काढून दिले जातील
टॅग्स :Healthआरोग्यLokmat Eventलोकमत इव्हेंट