बुटीबोरीत रासायनिक प्रकल्प
By Admin | Updated: March 22, 2015 02:35 IST2015-03-22T02:35:33+5:302015-03-22T02:35:33+5:30
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील एनसीएसआर रासायनिक प्रकल्पाचे उद््घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

बुटीबोरीत रासायनिक प्रकल्प
नागपूर : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील एनसीएसआर रासायनिक प्रकल्पाचे उद््घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पातून दर वर्षी ६०० मे.टन. सिलिकाचे उत्पादन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला आमदार शोभा फडणवीस, समीर मेघे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी एम.जी. सिन्नरकर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे नितीन लोणकर, प्रवीण खंडेलवाल, मनीष संघवी, नितीन गुजलवार, प्रशांत मेश्राम आदी उपस्थित होते. एनसीएसआर रासायनिक प्रकल्प दीड कोटीचा असून त्यातून सिलिका तयार होणार आहे. रबर, टायर, पेंट आणि कृषी क्षेत्रातील बायो फर्टिलायझरमध्ये त्याचा वापर केला जातो,अशी माहिती प्रकल्पाचे भागीदार निखील धोटे यांनी दिली. (प्रतिनिधी)