शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

फटाके फोडताय.. सावधान! मोठ्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2022 21:21 IST

Nagpur News फटाक्यांच्या वायुप्रदूषणामुळे दम्यासह विविध आजारही वाढतात. त्यामुळेच फटाके फोडताय सावधान, असा इशारा कान, नाक व घसा (इएनटी) तज्ज्ञांनी दिला आहे.

नागपूर : दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. मात्र, सावधपणे फटाके न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते. दरवर्षी सुमारे पाच टक्के रुग्णांना कानांच्या गंभीर समस्या होतात. फटाक्यांच्या वायुप्रदूषणामुळे दम्यासह विविध आजारही वाढतात. त्यामुळेच फटाके फोडताय सावधान, असा इशारा कान, नाक व घसा (इएनटी) तज्ज्ञांनी दिला आहे.

दिवाळीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मानवी शरीरावरही गंभीर परिणाम होतात. विशेषत: आपले कान हे साधारणपणे ३० ते ४० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतात. मात्र, विविध आवाजाचे फटाके हे १५० ते १६० डेसिबलपर्यंत आवाज करणारे असतात. त्या आवाजामुळे कानात दडे बसणे, कान दुखणे, डोके दुखण्यापासून ते कानाचा पडदा फाटणे, कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येण्यापर्यंतचे त्रास होऊ शकतो.

- कानांच्या समस्यांचे रुग्ण वाढतात

मेडिकल व मेयातील इएनटी विभागात दरवर्षी फटाक्यांमुळे कानांच्या समस्यांनी त्रस्त किमान पन्नासवर रुग्ण येतात. जेव्हा १५०-१६० डेसिबलचे फटाके अचानक कानाजवळ फुटतात, तेव्हा त्याचा घातक परिणाम होतो. औषधांनी काहीअंशी कानांची श्रवण क्षमता आणली जाऊ शकते. अशा रुग्णांसाठी ऑडियोमेट्री तपासणी आवश्यक ठरत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

- फटाक्यांपासून होणारे नुकसान

नायट्रेट - मज्जातंतू निष्क्रियता, नायट्रिट-बेशुद्ध होणे, लेड (शिसे) - मज्जातंतूवर दुष्परिणाम, कॅडमियम - रक्तातील लोहाचे प्रमाण घटणे, किडनी निष्क्रिय होणे, सोडियम - त्वचेचे विकार, झिंक - उलट्या होणे, कॉपर - श्वासनलिकेचा विकार, मॅग्नेशियम - त्वचेचे विकार. ध्वनिप्रदूषणामुळे कर्णबधिरतेसह रक्तदाब वाढणे, हृदयविकार, झोपमोड असे परिणाम दिसून येतात.

शक्यतो फटाक्यांना दूरच ठेवा. फटाक्यापासून सुरक्षित अंतरावर उभे राहावे. पालकांच्या नजरेखाली फटाके फोडावे. बालकांना दूर ठेवा. मोकळ्या जागेत फटाके फोडा. शक्यतो सुतीकपडे घाला व पायात जुते वापरा. कानांमध्ये बोळे ठेवा, बोळ्यांमुळे ५० टक्के आवाजात घट होते. कुठलीही समस्या झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

-डॉ. पिनाक दंदे

टॅग्स :fire crackerफटाके