जाळून मनुस्मृती, केली हीनदिनांची मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:33+5:302020-12-26T04:07:33+5:30

नागपूर : जातीभेदावर आधारित वर्णव्यवस्था मजबूत करणारा व भारतीय स्त्रीला गुलामगिरीच्या साखळदंडात बंदिस्त करणारा धर्मग्रंथ मनुस्मृतीचे जाहीर दहन युगपूरूष ...

Burning Manusmriti, liberation of Keli Hindin | जाळून मनुस्मृती, केली हीनदिनांची मुक्ती

जाळून मनुस्मृती, केली हीनदिनांची मुक्ती

नागपूर : जातीभेदावर आधारित वर्णव्यवस्था मजबूत करणारा व भारतीय स्त्रीला गुलामगिरीच्या साखळदंडात बंदिस्त करणारा धर्मग्रंथ मनुस्मृतीचे जाहीर दहन युगपूरूष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २५ डिसेंबर १९२७ रोजी केले आणि दास्यातून स्त्रियांची, धर्माने लादलेल्या गुलामगिरीतून दलितांच्या मुक्तीची मशाल पेटविली. महाडच्या या घटनेने मनुवादी धर्मांधांचे धाबे दणाणले. त्या घटनेला आज ९३ वर्षे पूर्ण झाली. हा दिवस दरवर्षी मनुस्मृती दहन दिन व स्त्री मुक्तीदिन म्हणून साजरा केला जाताे. शुक्रवारीही विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी संविधान चाैक येथे हा दिवस साजरा केला. महामानवाला अभिवादन करीत मुक्तीदिनासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडी ()

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शहर अध्यक्ष रवी शेंडे व जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथे "स्त्री मुक्ती दिवस" साजरा करण्यात आला. मनुस्मृती या ग्रंथाचे तसेच आधुनिक मनुस्मृतीचे प्रतीक म्हणून केंद्र सरकारने पारित केलेल्या तिन्ही काळ्या कृषी कायद्यांच्या प्रतींचे दहन यावेळी करण्यात आले. यावेळी राहुल वानखेडे, प्रा. रमेश पिसे, धर्मेश फुसाटे, राहुल दहिकर, विवेक हाडके, प्रफुल मानके, वनमाला उके, नालंदा गणवीर, मायाताई शेंडे, कांचन देवगडे, अनिता मेश्राम, प्रिया सोनकुसरे, रेखा वानखेडे, मंदा वैद्य, अलका गजभिये, वंदना पेटकर, चारुशिला गोस्वामी, मीना जुंबळे, स्णर्णलता भांगे, नंदिनी सोनी, प्रिया सोनकुसरे, किरण देवरे, अजयकुमार बोरकर, दिनकर वाठोरे, प्रशांत नारनवरे, सुनील रामटेके, गोवर्धन भेले, हरीश नारनवरे, सुदर्शन पाटील, शिशुपाल देशभ्रतार, गौतम पिल्लेवान, प्रवीण पाटील, निर्भय बागडे, मिलिंद मेश्राम, सुनील इंगळे, अंकुश मोहिले, सुमधू गेडाम, धम्मदीप लोखंडे, सिध्दांत पाटील, अविराज थुल, अतुल गजभिये, शिलवंत सोनटक्के, बालू हरकंडे, आनंद बागडे, सिध्दार्थ भांगे, अमरदीप तिरपुडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला. यावेळी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, नरेंद्र धनविजय, डॉ.सोहन चवरे, सुभाष गायकवाड, बबनराव ढाबरे, जालींदर गजभारे, राजकुमार रंगारी, प्रेमदास बागडे, अजय वानखेडे, देवीदास.हेलोडे, अविनाश इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Burning Manusmriti, liberation of Keli Hindin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.