वांजरा येथे घरफाेडी, ३५ हजाराचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:02+5:302021-02-05T04:43:02+5:30
माैदा : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत साेने-चांदीचे दागिने असा एकूण ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना ...

वांजरा येथे घरफाेडी, ३५ हजाराचे दागिने लंपास
माैदा : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत साेने-चांदीचे दागिने असा एकूण ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्यांतर्गतच्या वांजरा येथे १८ ते २२ जानेवारीदरम्यान घडली.
चंद्रकला राजू भाेयर (३८, रा. वांजरा, ता. माैदा) या लग्नसाेहळ्यानिमित्त बाहेरगावी गेल्या हाेत्या. दरम्यान अज्ञात आराेपीने त्यांच्या घराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात आराेपीने घरातील कपाटात ठेवलेले साेने-चांदीचे दागिने असा ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच चंद्रकला भाेयर यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक फाैजदार विजयसिंग ठाकूर करीत आहेत.