लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : चाेरट्याने घरफाेडी करीत हिरे व साेन्याचे दागिने तसेच राेख रक्क्म असा एकूण ३२ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा परिसरातील वृंदावन सिटी येथे घडली असून, शुक्रवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आली. राजेश नवरंगलाल अग्रवाल (५१, रा. घर नंबर ४/५ वासुदेव, वृंदावन सिटी, जामठा) यांनी त्यांच्याकडील दागिने व राेख रक्कम घरातील कपाटाच्या लाॅकरमध्ये ठेवले हाेते. त्यांच्या घरी कुटुंबीयांसह काही नाेकरांचाही वावर आहे. दरम्यान, लाॅकरमधील हिरे व साेन्याचे दागिने तसेच राेख गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या ऐवजाची एकूण किंमत ३२ लाख ७० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. हे दागिने व राेख रक्कम मंगळवार (दि. १९)ते गुरुवार (दि. २१) या काळात चाेरीला गेले असून, ही चाेरी घरातील नाेकराने केल्याचा संशय त्यांनी पाेलीस तक्रारीत व्यक्त केला आहे. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि ३८१ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक भातकुले करीत आहेत.
वृंदावन सिटीत घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:09 IST