तिवस्करवाडीत घरफाेडी, तीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST2021-05-31T04:07:45+5:302021-05-31T04:07:45+5:30
हिंगणा : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रकमेसह साेन्याचे दागिने असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही ...

तिवस्करवाडीत घरफाेडी, तीन लाखांचा ऐवज लंपास
हिंगणा : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रकमेसह साेन्याचे दागिने असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तिवस्करवाडी येथे शनिवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
तिवस्करवाडी येथील रहिवासी नरेंद्र चरणदास मेश्राम यांचे कुटुंबीय घरातील हाॅलमध्ये झाेपले हाेते. दरम्यान, घराच्या मागील स्वयंपाक खाेलीच्या खिडकीतून दाराची कडी उघडून चाेरट्याने घरात प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील कपाटात ठेवलेले राेख ८० हजार रुपये आणि पाच ताेडे साेन्याचे दागिने असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. पहाटे ४ वाजताच्या सुमारास नरेंद्र मेश्राम यांना जाग आली तेव्हा घराचे मागील दार उघडे दिसले. शिवाय, घरातील कपाटसुद्धा उघडे हाेते. लगेच त्यांनी हिंगणा पाेलिसांना घटनेची सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे. मेश्राम यांच्या घराच्या काही अंतरावरसुद्धा चाेरट्याने एका घराचे दार उघडले. मात्र तेथे चाेरट्याच्या हाती काहीही लागले नसल्याचे समजते.