तारणी येथे घरफाेडी, घरगुती साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST2021-09-21T04:10:12+5:302021-09-21T04:10:12+5:30

कुही : चाेरट्याने घरफाेडी करीत १७ हजार ५०० रुपये किमतीचे घरगुती साहित्य चाेरून नेले. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या ...

Burglary at Tarani, household goods lampas | तारणी येथे घरफाेडी, घरगुती साहित्य लंपास

तारणी येथे घरफाेडी, घरगुती साहित्य लंपास

कुही : चाेरट्याने घरफाेडी करीत १७ हजार ५०० रुपये किमतीचे घरगुती साहित्य चाेरून नेले. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तारणी येथे शुक्रवारी (दि. १७) मध्यरात्री घडली.

राेशन नीळकंठ सारवे (४१, रा. जुना फुटाळा, भरतनगर, नागपूर) यांची तारणी (ता. कुही) शिवारात शेती असून, शेतात घर आहे. तिथे कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने आठ हजार रुपयांची इलेक्ट्रिक वायर, दाेन हजार रुपयांचे नळ, दाेन हजार रुपयांचे शाॅवर, १,५०० रुपयांचा वाॅश बेसिनचा नळ, दाेन हजार रुपयांचे किचनमधील नळ, दाेन हजार रुपयांचे स्टाॅपकाॅक असे एकूण १७ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच राेशन सारवे यांनी रविवारी (दि. २०) पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार विजय कुमरे करीत आहेत.

Web Title: Burglary at Tarani, household goods lampas