सोनेगावात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:00+5:302021-02-05T04:49:00+5:30
नागपूर - सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भेंडे लेआऊटमध्ये राहणारे माधव दत्तात्रय लोमटे (वय ६३) यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ...

सोनेगावात घरफोडी
नागपूर - सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भेंडे लेआऊटमध्ये राहणारे माधव दत्तात्रय लोमटे (वय ६३) यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने लंपास केले. रविवारी रात्री ८ ते ११ यावेळेत लोमटे आपल्या दाराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधून चोरट्याने घरफोडी केली. घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे लोमटे यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
----
वाठोड्यात चोरी
नागपूर - रेल्वे लाईनजवळ ठेवलेले ७० हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर - हैदराबाद बायपास रिंगरोडजवळच्या रेल्वे रुळांचे काम सुरू आहे. यासाठी कंत्राटदाराने तेथे ठेवलेले जॉक पाईप, लोखंडी चॅनल, जाळी असे एकूण ७० हजारांचे साहित्य चोरट्यांनी २८ ते २९ जानेवारीच्या दरम्यान चोरून नेले. रविवारी याप्रकरणी माधव मालियाद्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
----