काटाेलमध्ये घरफाेडीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:36+5:302021-01-08T04:23:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटोल : शहरात वाढत्या घरफाेडीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात शनि चाैकातील घरफाेडीची घटना ...

काटाेलमध्ये घरफाेडीचे सत्र सुरूच
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटोल : शहरात वाढत्या घरफाेडीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात शनि चाैकातील घरफाेडीची घटना ताजी असतानाच पुन्हा शहरातील आयुडीपी भागात साेमवारी (दि. ४) चाेरट्याने डाव साधत एक लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला.
रूपाली अशाेक इंगळे (वय ३१) या एस. टी. महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असून, आयुडीपी परिसरातील चंद्रशेखर डाेईजाेड यांच्याकडे भाड्याने राहतात. साेमवारी त्या ड्युटीवर गेल्या हाेत्या, तर घरमालकदेखील कामानिमित्त बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, चाेरट्याने इंगळे यांच्या खाेलीच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरात ठेवलेले साेन्याचे मंगळसूत्र, साेन्याचे दागिने, लक्ष्मीची चांदीची मूर्ती असा एकूण एक लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. मंगळवारी रात्री ९.३० वाजता इंगळे घरी आल्या असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे. वाढत्या चाेरीच्या घटना लक्षात घेत पाेलिसांनी चाेरट्यांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.