रामदासपेठेत घरफोडी, अपार्टमेंटमधील तिसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:08 IST2021-03-31T04:08:21+5:302021-03-31T04:08:21+5:30
साई अंकुर अपार्टमेंट, रामदासपेठ येथील निवासी कोळसा व्यापारी मंजितसिंह भाटिया कुटुंबासह इंदूरला गेले होते. २८ मार्चला संध्याकाळ ते २९ ...

रामदासपेठेत घरफोडी, अपार्टमेंटमधील तिसरी घटना
साई अंकुर अपार्टमेंट, रामदासपेठ येथील निवासी कोळसा व्यापारी मंजितसिंह भाटिया कुटुंबासह इंदूरला गेले होते. २८ मार्चला संध्याकाळ ते २९ मार्चच्या सकाळच्या दरम्यान अज्ञात आरोपीने भाटिया यांच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटचे कुलूप तोडून ३.५० लाख रुपये रोख व दागिने चोरले. रविवारी सकाळी चोरीच्या घटनेचा उलगडा झाला. अपार्टमेंटचे चौकीदार लवकुश मिश्रा, चंद्रपूर यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर भाटिया यांचे जावई जायसवाल व मुलगी राहते. ते सुद्धा भाटिया यांच्यासोबत गेले होते. चंद्रपूर निवासी जायसवाल यांच्या फ्लॅटमध्ये यापूर्वी दोनवेळा चोरी झाली आहे. दुसरी चोरीची घटना तीन महिन्यापूर्वीचीच आहे. यावरून भाटिया यांच्या फ्लॅटमध्ये चोरी करणारा व्यक्ती जाणकार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याने आपली ओळख लपविण्यासाठी सीसीटीव्ही मोज्याने झाकले होते. घटनेच्या वेळी दोन संशयित व्यक्ती फ्लॅटजवळ असल्याचे दिसून येत आहे.
..........