प्रतापनगरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:15 IST2021-02-21T04:15:04+5:302021-02-21T04:15:04+5:30

नागपूर - स्वावलंबीनगरातील सुजाता मेन्शनमध्ये राहणाऱ्या पद्मा मनमोहन तिवारी (वय ४५)यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि दागिन्यांसह पावणेपाच ...

Burglary in Pratapnagar | प्रतापनगरात घरफोडी

प्रतापनगरात घरफोडी

नागपूर - स्वावलंबीनगरातील सुजाता मेन्शनमध्ये राहणाऱ्या पद्मा मनमोहन तिवारी (वय ४५)यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि दागिन्यांसह पावणेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली.

पद्मा तिवारी यांच्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण जोत्सना यांची शुक्रवारी दुपारी प्रकृती बिघडल्याने १. २० ते २ च्या सुमारास त्या दाराला कुलूप लावून प्रतापनगर चौकाजवळच्या खासगी इस्पितळात गेल्या. परत आल्या तेव्हा पद्मा यांना त्यांच्या दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून सर्व साहित्य अस्तव्यस्त केले आणि रोख ६० हजार सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ४ लाख, ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. प्रतापनगर पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

---

पारडीत ट्रकमधून पावणेपाच लाखांचे साहित्य लंपास

नागपूर - हैदराबादहून झारखंडकडे निघालेल्या ट्रकमधून ४ लाख, ६५ हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. २२ जानेवारीला सायंकाळी घडलेल्या या चोरी प्रकरणात जगदीश सोनीराम बालपांडे (वय ३२) यांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

Web Title: Burglary in Pratapnagar