पेठ कालडाेंगरी येथे घरफाेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:07 IST2021-07-01T04:07:51+5:302021-07-01T04:07:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क धामणा : कुटुंबीय झाेपेत असताना अज्ञात चाेरट्यांनी घरफाेडी करीत राेख २२ हजार रुपये आणि १४ ताेळे ...

Burglary at Peth Kaldangari | पेठ कालडाेंगरी येथे घरफाेडी

पेठ कालडाेंगरी येथे घरफाेडी

लाेकमत न्यूज नेटवर्क

धामणा : कुटुंबीय झाेपेत असताना अज्ञात चाेरट्यांनी घरफाेडी करीत राेख २२ हजार रुपये आणि १४ ताेळे साेन्याचे दागिने चाेरून नेले. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठ कालडाेंगरी येथे बुधवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

पेठ कालडाेंगरी येथील सुधाकर डवरे व माेरेश्वर डवरे यांचे संयुक्त कुटुंब असून, त्यांचे गावालगतच्या शेतात घर आहे. डवरे यांचा शेती व दूध डेअरीचा व्यवसाय आहे. मंगळवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास सर्व कुटुंबीय झाेपेत असताना, शेतीच्या ताराचे कुंपण कापल्यानंतर अज्ञात चाेरट्यांनी किचनचे दार ताेडून घरात प्रवेश केला. यात चाेरट्यांनी घरातील कपाट ताेडून तेथील दाेन मंगळसूत्रं, लक्ष्मीहार, साेन्याच्या बांगड्या, तीन अंगठ्या, चेन, चार कानांतील डाेरले, जाेडवे, पाचवी असे एकूण १४ ताेळे साेन्याचे दागिने व राेख २२ हजार रुपये घेऊन पाेबारा केला.

दरम्यान, पहाटे ५ वाजताच्या सुमारास कुटुंबीय झाेपून उठले असता, घरात चाेरी झाल्याने आढळून आले. याबाबत लगेच हिंगणा पाेलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळताच पाेलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांनी पाेलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पाेलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. श्वानाने शेतामधून काही अंतरावर गावात दिशा दाखविल्यानंतर गावातील हरिराम घाटाेर्डे व शेषराव भाकरे यांच्या घराच्या दाराची कडी चाेरट्यांनी बाहेरून बंद केल्याचे निदर्शनात आले. शिवाय, चाेरट्यांनी माेरेश्वर डवरे यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यांना विष देऊन ठार केले. या घटनेत चाेरटे हे टाेळीने दाखल झाले असावे, असा अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Burglary at Peth Kaldangari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.