नगरधनमध्ये घरफाेडी, ५२ हजारांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:41+5:302021-02-20T04:20:41+5:30
रामटेक : अज्ञात चाेरट्याने दाेन ठिकाणी घरफाेडी करीत राेख रक्कम व साेने-चांदीचे दागिने असा एकूण ५२ हजार ७०० ...

नगरधनमध्ये घरफाेडी, ५२ हजारांचा मुद्देमाल लंपास
रामटेक : अज्ञात चाेरट्याने दाेन ठिकाणी घरफाेडी करीत राेख रक्कम व साेने-चांदीचे दागिने असा एकूण ५२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरधन येथे मंगळवारी (दि. १६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मनाेहर गणपत मस्के (३६, रा. नगरधन, ता. रामटेक) व त्यांचे शेजारी हे दाेन्ही कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान साेमवारी (दि. १५) मध्यरात्रीच्या सुमारास चाेरट्याने घराच्या दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील आलमारीमध्ये ठेवलेले ३५ हजार रुपये किमतीचे साेने-चांदीचे दागिने व राेख १०,२०० रुपये लंपास केले. त्यानंतर चाेरट्याने मस्के यांच्या शेजाऱ्यांकडे डाव साधला. शेजाऱ्याच्या घरातील ५,००० रुपये किमतीचे तीन चांदीचे सिक्के व राेख २,५०० रुपये असा दाेन्ही घरांतून ५२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पाेबारा केला. मंगळवारी सकाळच्या सुमारास कुटुंबीय घरी आले असता, घरात चाेरी झाल्याचे आढळून आले.
या प्रकरणी फिर्यादी मनाेहर मस्के यांच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक फाैजदार सदाशिव काटे करीत आहेत.