मेहंदी येथे घरफोडी, ५४ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:00+5:302021-03-13T04:13:00+5:30
पारशिवनी : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ...

मेहंदी येथे घरफोडी, ५४ हजारांचा ऐवज लंपास
पारशिवनी : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहंदी येथे बुधवारी मध्यरात्री घडली.
अनिल गणपती बिहुणे (रा. मेहंदी, ता. पारशिवनी) व त्यांचे कुटुंबीय बुधवारी रात्री घरी गाढ झोपेत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चाेरट्याचे दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. कपाटातील २० हजार रुपयांची साेन्याची पाेत, ३० हजार रुपयांची साेन्याची चेन, चांदीच्या ताेरड्या व तीन हजार रुपये राेख असा एकूण ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पाेबारा केला. त्यानंतर या चाेरट्याने शेजारच्या घरी चाेरीचा प्रयत्न केला. घरातील मंडळी जागी झाल्याने चाेर पळून गेला. अनिल बिहुणे यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला, असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक संदीप उबाळे करीत आहेत.