मालेवाडा येथे घरफाेडी, राेख ३० हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:08 IST2021-04-25T04:08:25+5:302021-04-25T04:08:25+5:30

भिवापूर : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत राेख ३० हजार रुपये चाेरून नेले. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मालेवाडा ...

Burglary at Malewada, line 30,000 lamps | मालेवाडा येथे घरफाेडी, राेख ३० हजार लंपास

मालेवाडा येथे घरफाेडी, राेख ३० हजार लंपास

भिवापूर : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत राेख ३० हजार रुपये चाेरून नेले. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मालेवाडा येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, तर शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली.

अनिल माेतीराम गावंडे (४७, रा. मालेवाडा, ता. भिवापूर) हे घरी मध्यरात्री १ वाजता झाेपी गेले. यानंतर अज्ञात आराेपीने त्यांच्या घराच्या मागील सिमेंट दाराचा कडीकाेयंडा ताेडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त फेकून लाेखंडी कपाटात एका स्टिलच्या डब्यात ठेवलेले राेख ३० हजार रुपये चाेरून नेले. आराेपीने कपाटातील साेन्याचे दागिने चाेरून नेल्याचा संशय आहे. गावंडे यांची पत्नी बाहेरगावी गेली असून, ती आल्यानंतर साेन्याच्या दागिन्यांबाबत निश्चित सांगता येईल. चाेरट्याने शेजारी बाळू मुरलीधर इंगाेले यांच्याकडेही चाेरी केल्याची माहिती गावंडे यांनी पाेलिसांना दिली. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस हवालदार भगवानदास यादव करीत आहेत.

Web Title: Burglary at Malewada, line 30,000 lamps