कल्पतरु कॉलनी येथे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:07 IST2021-07-15T04:07:49+5:302021-07-15T04:07:49+5:30
कामठी : कामठी-नागपूर मार्गावरील कल्पतरु कॉलनी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल ...

कल्पतरु कॉलनी येथे घरफोडी
कामठी : कामठी-नागपूर मार्गावरील कल्पतरु कॉलनी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पतरु कॉलनी येथील अब्दुल कादिर अब्दुल अखतर कुरेशी (६५) हे ११ जुलैला कुटुंबासह नागपूर येथील नातेवाईकाकडे गेले होते. बुधवारी सकाळी त्यांच्या घराशेजारी नागरिकांना घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती अब्दुल कादिर यांना दिली. ते तातडीने घरी परत आले. त्यांनी घराचे दार उघडले असता कपाट फोडलेले दिसून आले. कपाटातील दोन घड्याळ व घरासमोर ठेवलेली कार क्रमांक एमएच-४०-बीई-६४९४ किंमत ३ लाख असा एकूण ३ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. अब्दुल कादिर यांनी याबाबतची तक्रार नवीन कामठी पोलीस स्टेशनला दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर करीत आहेत.