खापरखेडा येथील किराणा दुकानात चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:07 IST2021-05-01T04:07:39+5:302021-05-01T04:07:39+5:30

खापरखेडा : चाेरट्याने किराणा दुकानात हात साफ करीत राेख रक्कम व काही साहित्य असा एकूण २९ हजार रुपये किमतीचा ...

A burglary at a grocery store in Khaparkheda | खापरखेडा येथील किराणा दुकानात चाेरी

खापरखेडा येथील किराणा दुकानात चाेरी

खापरखेडा : चाेरट्याने किराणा दुकानात हात साफ करीत राेख रक्कम व काही साहित्य असा एकूण २९ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) येथे बुधवारी (दि. २८) मध्यरात्री घडली.

मनीष विजय राऊत (३२, रा. इंदिरानगर, खापरखेडा, ता. सावनेर) याने त्याचे दुकान बंद केले हाेते. दरम्यान, मध्यरात्री दुकानाच्या परिसरात कुणीही नसताना चाेरट्याने शटरचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने १० किलाे तुरीची डाळ, २० किलाे साखर, डिटर्जंट पावडर, सिगारेटची पाकिटे, वेट ग्रॅन्डर मशीन, सुपारीची पाकिटे, किरकाेळ साहित्य व दाेन हजार रुपये राेख असा एकूण २९ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच मनीष राऊत याने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहाय्यक फाैजदार शरद डाेंगरे करीत आहेत.

Web Title: A burglary at a grocery store in Khaparkheda