शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गोळीबार चौक अन् लालगंज परिसरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 23:27 IST

मध्य नागपुरातील अतिशय वर्दळीच्या परिसर असलेला गोळीबार चौक आणि लालगंज परिसरातील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटून नेली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे इतवारी परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देलाखोंचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य नागपुरातील अतिशय वर्दळीच्या परिसर असलेला गोळीबार चौक आणि लालगंज परिसरातील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटून नेली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे इतवारी परिसरात खळबळ उडाली आहे.मन्सूर फक्रुद्दीन चौधरी (५०) हे भारतमाता चौकाजवळ भाड्याने राहतात. त्यांचा हार्डवेयरचा व्यवसाय आहे. कुटुंबात पत्नी अल्फिया आणि तीन मुली आहेत. मन्सूर एका ओळखीच्या व्यक्तीसोबत हार्डवेयरचे काम करतात, तर अल्फिया या प्लास्टिकच्या वस्तू ऑनलाईन विक्री करतात. तिन्ही मुलींच्या लग्नासाठी त्यांनी दागिने खरेदी करून ठेवले होते. २००७ मध्ये दुबई येथून आल्यानंतर ते नागपुरातच स्थायिक झाले.मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता मन्सूर आणि अल्फिया मुलींसह रमजानची नमाज अदा करण्यासाठी बोहरा मशीद येथे गेले होते. या दरम्यानच चोरांनी आपले काम केले. चोरांनी अगोदर मन्सूर यांच्या शेजारी राहणाऱ्या घराचे कुलूप तोडले. तिथे कुठलीही किमती वस्तू न मिळाल्याने त्यांनी मन्सूरच्या घराचे कुलूप तोडले. घराच्या आलमारीचेही कुलूप तोडले. त्यात ६० तोळे सोन्याचे दागिने आणि ५५ हजार रुपये चोरून नेले. रात्री ८.३० वाजता मन्सूर कुटुंबीय घरी परत आले. कुलूप तुटलेले पाहून त्यांना धक्का बसला. आत गेले तेव्हा आलमारी व लॉकरमधील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. हे सर्व पाहून अल्फिया बेशुद्ध झाल्या. तहसील पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलिसही घटनास्थळी पोहोचले. परिसरातील जाणकार व्यक्तीने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.घटनास्थळ हा रहिवासी परिसर आहे. बाहेरचा गुन्हेगार येथे येऊन चोरी करणे शक्य नाही. आरोपींना चौधरी दाम्पत्य व शेजारी दोन तासानंतरच घरी परत येतील याची माहिती होती. त्यामुळे त्याने सहजपणे आपले काम केले. सोन्याची सध्याची किंमत जवळपास १५ लाख रुपये आहे. परंतु पोलिसांनी त्याची किंमत ४ लाख इतकी लावली आहे.दुसरी घटना मस्कासाथ येथील तेलीपुरा येथे घडली. डॉ. राजेश लक्ष्मीकांत जैन हे तेलीपुरा पेवठा येथे राहतात. ७ मे रोजी रात्री भाचीच्या लग्नासाठी ते जबलपूरला गेले होते. यादरम्यान चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ७८ हजार रुपये आणि ५० हजार रुपयाचे दागिने चोरून नेले. बुधवारी सकाळी डॉ. जैन घरी परत आले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. शांतिनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.मेरिटमध्ये आली मुलगीमंगळवारी चौधरी दाम्पत्यांची मुलगी नकिया हिने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केले. यामुळे चौधरी दाम्पत्य दुपारपासूनच आनंदात होते. परंतु सायंकाळी जीवनभराची कमाई एका झटक्यात गमावल्याने चौधरी दाम्पत्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. ५६ हजार रुपये मुलीच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी ठेवले होते.

 

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर