चनकापूर येथे घरफाेडी, दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:36+5:302021-07-12T04:07:36+5:30

खापरखेडा : चाेरट्याने घरफाेडी करीत कपाटातील २६ हजार ४०० रुपये किमतीचे साेन्याचे दागिने चाेरून नेले. ही घटना खापरखेडा (ता. ...

Burglary at Chankapur, jewelery lampas | चनकापूर येथे घरफाेडी, दागिने लंपास

चनकापूर येथे घरफाेडी, दागिने लंपास

खापरखेडा : चाेरट्याने घरफाेडी करीत कपाटातील २६ हजार ४०० रुपये किमतीचे साेन्याचे दागिने चाेरून नेले. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर येथे नुकतीच घडली.

प्रमाेद भाऊराव काटे (३६, रा. जयभाेले नगर, चनकापूर, ता. सावनेर) हे त्यांच्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराची कडी व कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने कपाटातील २४ हजार रुपयांचे साेन्याचे मंगळसूत्र व २,४०० रुपयांचा साेन्याचा अन्य दागिना असा एकूण २६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच प्रमाेद काटे यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार सूर्यभान जळते करीत आहेत.

Web Title: Burglary at Chankapur, jewelery lampas