काेपरा येथे घरफाेडी, तीन चाेरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:12 IST2021-08-15T04:12:15+5:302021-08-15T04:12:15+5:30

माैदा : घरात प्रवेश करून डीजे मिक्सर मशीन चाेरून नेल्याची घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेपरा येथे बुधवारी (दि. ...

Burglary at Capra, three arrested | काेपरा येथे घरफाेडी, तीन चाेरट्यांना अटक

काेपरा येथे घरफाेडी, तीन चाेरट्यांना अटक

माैदा : घरात प्रवेश करून डीजे मिक्सर मशीन चाेरून नेल्याची घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेपरा येथे बुधवारी (दि. ११) दुपारी घडली. या प्रकरणात पाेलिसांनी तिघांना नुकतीच अटक केली आहे.

रुपेश शालिक करारे (२८, रा. दुर्गानगर, काेराडी नाका, नागपूर), रफिक शहा अब्दुल शहा (२२, रा. काेराडी, ता. कामठी) व रमेश देवलाल मेश्राम (२६, रा. स्नेहनगर, काेराडी नाका, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. या तिघांनी शेषराव नंगडू वडे, रा. काेपरा, ता. माैदा यांच्या घरी कुणीही नसताना आत प्रवेश केला आणि घरातील डीजे, मिक्सर मशीन चाेरून नेली. ही बाब लक्षात येताच हर्षल खेडकर याने शेषराव यांना सांगितली. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ४५४, ३८०, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तिन्ही आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार संजय देशमुख करीत आहेत.

Web Title: Burglary at Capra, three arrested