बिछवा येथे भरदिवसा घरफाेडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:31+5:302021-02-05T04:43:31+5:30
खापा : अज्ञात आराेपीने भरदिवसा घरफाेडी करून राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ...

बिछवा येथे भरदिवसा घरफाेडी
खापा : अज्ञात आराेपीने भरदिवसा घरफाेडी करून राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बिछवा येथे बुधवारी (दि.२७) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
मुरलीधर माणिकराव ढाेले (४५, रा. बिछवा, ता. सावनेर) हे आपल्या पत्नीसह घराला कुलूप लावून शेतात गेले हाेते. दरम्यान, अज्ञात आराेपीने त्यांच्या घराच्या मागील दारातून हात टाकून साखळी उघडून आत प्रवेश केला. यात आराेपीने कपाटात ठेवलेले १५ हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने व राेख १५,००० रुपये असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच ढाेले यांनी पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी भादंवि कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक फाैजदार दीपक मानवटकर करीत आहेत.