भिष्णूर येथे भरदिवसा घरफाेडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:20+5:302021-04-13T04:08:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भिष्णूर येथे अज्ञात आराेपीने भरदिवसा घरफाेडी केली. यात चाेरट्याने घरातील चांदीचे ...

भिष्णूर येथे भरदिवसा घरफाेडी
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भिष्णूर येथे अज्ञात आराेपीने भरदिवसा घरफाेडी केली. यात चाेरट्याने घरातील चांदीचे दागिने चाेरून नेले. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
भिष्णूर येथील सेवानिवृत्त शिक्षक सुखदेव पात्रीकर हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले हाेते. यादरम्यान घरी कुणीच नसल्याचे पाहून चाेरट्याने डाव साधला. घराचे कुलूप ताेडून चाेरट्याने आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप ताेडून तेथील लहान मुलाचे चांदीचे दागिने चाेरून नेले. राेख रक्कम व इतर माैल्यवान वस्तू हाती न लागल्याने चाेरट्याने कपाटातील साहित्यासह घरगुती सामान अस्ताव्यस्त फेकून नासधूस केली.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पात्रीकर कुटुंबीय घरी आले असता, ही घटना उघडकीस आली. याबाबत जलालखेडा पाेलिसांना सूचना देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पाेलीस निरीक्षक हरीश गावडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार अनिल जाेशी करीत आहेत.