शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘बंटी-बबली’ने ज्वेलरच्या दुकानातून दागिने उडविले, मात्र सीसीटीव्हीमुळे अडकले

By योगेश पांडे | Updated: June 14, 2023 15:41 IST

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : एका ‘बंटी-बबली’ने इतवारीतील ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखी करत सोन्याची कर्णफुले उडविली, मात्र सीसीटीव्हीमुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून दोन्ही आरोपी उत्तरप्रदेशमधील आहेत.

उत्तम व्यंकटेश सावरकर (५४, टांगा स्टॅंड, इतवारी) यांचे सावरकर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. १० जून रोजी दुपारच्या सुमारास एक महिला व पुरुष त्यांच्या दुकानात आले. त्यांनी काही दागिने खरेदी करण्याची इच्छा दर्शविली. सावरकर त्यांना दागिने दाखवत होते. ते परत गेल्यावर ६ ग्रॅमची कर्णफुले गायब असल्याचे लक्षात आले. सावरकर यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता महिला-पुरुषानेच ते गायब केल्याची बाब समोर आली. त्यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

पोलिसांनी दुकान तसेच परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोन्ही आरोपींचा शोध घेतला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सतिश रामस्वरूप सोनी (४५) व राणीदेवी संतोषकुमार सोनी (५०) या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील शुक्लागंज, प्रेमनगर येथील रहिवासी आहेत. या दोघांनी अशा पद्धतीने नागपुरात इतरही ठिकाणी चोरी केली आहे का याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीnagpurनागपूर