शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बंडू धोतरेंचे कार्य लोकचळवळ व्हावी : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:39 IST

मानव विरुद्ध निसर्ग असे तिसरे युद्ध होणार आहे. यात मानव आक्रमक आणि निसर्ग बचावात्मक पवित्रा घेत आहे. स्वार्थासाठी पर्यावरण नासवले जात आहे. ऐतिहासिक वारसा ही पुढील पिढ्यांची कमाई असून बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूने या वारसाचे जतन करण्याचे आव्हानात्मक कार्य स्वीकारले आहे. त्यांचे कार्य लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देवनराईतर्फे महाराष्ट्र वारसा जतन व संवर्धन परिक्रमचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानव विरुद्ध निसर्ग असे तिसरे युद्ध होणार आहे. यात मानव आक्रमक आणि निसर्ग बचावात्मक पवित्रा घेत आहे. स्वार्थासाठी पर्यावरण नासवले जात आहे. ऐतिहासिक वारसा ही पुढील पिढ्यांची कमाई असून बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूने या वारसाचे जतन करण्याचे आव्हानात्मक कार्य स्वीकारले आहे. त्यांचे कार्य लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.वनराई फाऊंडेशनच्यावतीने महाराष्ट्र वारसा जतन व संवर्धन परिक्रमा मोटारसायकल रॅली नागपुरात पोहोचल्यानंतर इको प्रो या संस्थेचे बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूचे स्वागत केले. यावेळी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, बंडू धोतरे, गोपाळराव ठोसर उपस्थित होते. सुरेश द्वादशीवार म्हणाले, चंद्रपूरच्या किल्ल्याची शोभा वाढावी यासाठी बंडू धोतरे आणि चमुने केलेले कार्य अभिमानास्पद आहे. ३५० वर्षे जुन्या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षणाचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. जागतिक संघटना, धनवंत संघटनांनी स्वीकारावे असे हे आव्हान आहे. आज सरकारवर निसर्ग, ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सरकार स्वीकारत नसेल आणि बंडू धोतरेसारख्या तरुणांवर टाकत असेल, तर सरकारला काहीतरी वाटायला हवे. या कार्यात राजकीय पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. गिरीश गांधी म्हणाले, पर्यावरण क्षेत्रात काम करणे जिकिरीचे झाले आहे. राज्यकर्ते भौतिक स्वप्नात मग्न आहेत. बंडू धोतरेंचे कार्य मोलाचे आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी नागपुरात १५० वर्षे जुनी झाडे तोडण्यात येत आहेत, ही चुकीची बाब आहे. जंगल आणि मानव हे नाते वृद्धिंगत करण्याची गरज आहे. आज वृक्षारोपण कागदावरच होत आहे. झाडे किती जगली याचे ऑडिट होण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या बाबतीत राजकीय विचार बाजूला ठेवून कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गोपाळराव ठोसर यांनी जंगलाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन विकसित नसल्याचे मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना बंडू धोतरे यांनी आम्ही केले ते इतरांना सांगण्यासाठी परिक्रमा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली. प्रास्ताविक स्वानंद सोनी यांनी केले. संचालन अजय पाटील यांनी केले. आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.

टॅग्स :Vanraiवनराईnagpurनागपूर