शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

समूह साधन केंद्रासह माध्यमिक शाळांना बम्पर अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 20:19 IST

समग्र शिक्षा अभियानांतर्गत बम्पर अनुदान समूह साधन केंद्र, गट साधन केंद्र व माध्यमिक शाळांना मंजूर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुखांची देखभाल-दुरुस्तीचा निधी मिळत नसल्याची ओरड व्हायची.

ठळक मुद्देदेखभाल-दुरुस्तीच्या निधीचा प्रश्न निकाली : केंद्रप्रमुखांची ओरड थांबविली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत बम्पर अनुदान समूह साधन केंद्र, गट साधन केंद्र व माध्यमिक शाळांना मंजूर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुखांची देखभाल-दुरुस्तीचा निधी मिळत नसल्याची ओरड व्हायची. शाळांच्या वीज बिलाबरोबरच किरकोळ कामासाठी केंद्रप्रमुख, शिक्षकांना खिशातून रक्कम खर्च करावी लागायची. यासाठी सरकारने समग्र शिक्षा अभियानांतर्गत एक कोटीच्या जवळपास निधी दिला आहे.जिल्ह्यात १३६ समूह साधन केंद्र, १३ गटसाधन केंद्र व २३ माध्यमिक शाळा आहेत. सरकारने निधी देऊन केंद्रप्रमुख, गट साधन केंद्र व माध्यमिक शाळांना मोठा दिलासा दिला आहे. यासंदर्भातील अनुदान नुकतेच जिल्हा परिषदेने संबंधित व्यवस्थापनाच्या खात्यावर वर्ग केले़ समूह साधन केंद्राला प्रति ३६ हजार रुपयांप्रमाणे १३६ केंद्रांना ५१ लाख ४८ हजार रुपये तर पंचायत समितीस्तरावर असलेल्या १३ गट साधन केंद्रांना प्रति ६७ हजार रुपये असे ९लाख १० हजार रुपये व जिल्हा परिषदेच्या २३ माध्यमिक शाळांना पटसंख्येनुसार ९ लाख ८६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला़ यामध्ये आठ नगरपालिकेच्या शाळांचाही समावेश आहे़ हे अनुदान पटसंख्येनुसार देण्यात आले असून, ६१ ते १०० पटसंख्या असलेल्या शाळांना २३ हजार रुपये, १०१ ते २५० पटसंख्येसाठी २० हजार, २५१ ते १००० विद्यार्थ्यांमागे ५० हजार रुपये तसेच १ हजारावरील पटसंख्येसाठी ७५ हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे़ पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी शाळा व संबंधित आस्थापनांना मिळाल्याने आतापर्यंत होणरी बोंबाबोंब थांबणार आहे़ यापूर्वी सादिलचा निधी शाळांना मिळायचा़ मात्र, त्यावर शासनाने बंधने आणली़ हा निधीच बंद करण्यात आला़ त्यामुळे शाळांची स्टेशनरी, वीज बिल, विविध कार्यक्रमांचा खर्च, चहापान, बैठकांचा खर्च हा शिक्षकांना खिशातून करावा लागायचा़ आता या बम्पर अनुदानामुळे शिक्षकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे़ २०१९-२० या वर्षातील हे अनुदान आहे़

टॅग्स :fundsनिधीGovernmentसरकारSchoolशाळा