समूह साधन केंद्रासह माध्यमिक शाळांना बम्पर अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 08:18 PM2019-12-28T20:18:38+5:302019-12-28T20:19:59+5:30

समग्र शिक्षा अभियानांतर्गत बम्पर अनुदान समूह साधन केंद्र, गट साधन केंद्र व माध्यमिक शाळांना मंजूर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुखांची देखभाल-दुरुस्तीचा निधी मिळत नसल्याची ओरड व्हायची.

Bumper grants to middle schools with a group tool center | समूह साधन केंद्रासह माध्यमिक शाळांना बम्पर अनुदान

समूह साधन केंद्रासह माध्यमिक शाळांना बम्पर अनुदान

googlenewsNext
ठळक मुद्देदेखभाल-दुरुस्तीच्या निधीचा प्रश्न निकाली : केंद्रप्रमुखांची ओरड थांबविली

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत बम्पर अनुदान समूह साधन केंद्र, गट साधन केंद्र व माध्यमिक शाळांना मंजूर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुखांची देखभाल-दुरुस्तीचा निधी मिळत नसल्याची ओरड व्हायची. शाळांच्या वीज बिलाबरोबरच किरकोळ कामासाठी केंद्रप्रमुख, शिक्षकांना खिशातून रक्कम खर्च करावी लागायची. यासाठी सरकारने समग्र शिक्षा अभियानांतर्गत एक कोटीच्या जवळपास निधी दिला आहे.
जिल्ह्यात १३६ समूह साधन केंद्र, १३ गटसाधन केंद्र व २३ माध्यमिक शाळा आहेत. सरकारने निधी देऊन केंद्रप्रमुख, गट साधन केंद्र व माध्यमिक शाळांना मोठा दिलासा दिला आहे. यासंदर्भातील अनुदान नुकतेच जिल्हा परिषदेने संबंधित व्यवस्थापनाच्या खात्यावर वर्ग केले़ समूह साधन केंद्राला प्रति ३६ हजार रुपयांप्रमाणे १३६ केंद्रांना ५१ लाख ४८ हजार रुपये तर पंचायत समितीस्तरावर असलेल्या १३ गट साधन केंद्रांना प्रति ६७ हजार रुपये असे ९लाख १० हजार रुपये व जिल्हा परिषदेच्या २३ माध्यमिक शाळांना पटसंख्येनुसार ९ लाख ८६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला़ यामध्ये आठ नगरपालिकेच्या शाळांचाही समावेश आहे़ हे अनुदान पटसंख्येनुसार देण्यात आले असून, ६१ ते १०० पटसंख्या असलेल्या शाळांना २३ हजार रुपये, १०१ ते २५० पटसंख्येसाठी २० हजार, २५१ ते १००० विद्यार्थ्यांमागे ५० हजार रुपये तसेच १ हजारावरील पटसंख्येसाठी ७५ हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे़ पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी शाळा व संबंधित आस्थापनांना मिळाल्याने आतापर्यंत होणरी बोंबाबोंब थांबणार आहे़ यापूर्वी सादिलचा निधी शाळांना मिळायचा़ मात्र, त्यावर शासनाने बंधने आणली़ हा निधीच बंद करण्यात आला़ त्यामुळे शाळांची स्टेशनरी, वीज बिल, विविध कार्यक्रमांचा खर्च, चहापान, बैठकांचा खर्च हा शिक्षकांना खिशातून करावा लागायचा़ आता या बम्पर अनुदानामुळे शिक्षकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे़ २०१९-२० या वर्षातील हे अनुदान आहे़

Web Title: Bumper grants to middle schools with a group tool center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.