शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

सराफा दुकान फोडले

By admin | Updated: June 19, 2014 01:04 IST

छत आणि पीओपीचे प्लास्टर तोडून चोरटे अजनीतील एका सराफा दुकानात शिरले. आतमध्ये तोडफोड करून त्यांनी बेन्टेक्सचे दागिने चोरून नेले. सुदैवाने चोरट्यांना सोन्याचे दागिने गवसले नाही.

अजनीतील घटना : बेन्टेक्सचे दागिने लंपास, सोने वाचलेनागपूर : छत आणि पीओपीचे प्लास्टर तोडून चोरटे अजनीतील एका सराफा दुकानात शिरले. आतमध्ये तोडफोड करून त्यांनी बेन्टेक्सचे दागिने चोरून नेले. सुदैवाने चोरट्यांना सोन्याचे दागिने गवसले नाही. त्यामुळे सराफाचे मोठे नुकसान टळले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. राजू रामभाऊ येरपुडे हे अजनीतील अंबाशिवशक्तीनगरात राहतात. भगवाननगरमध्ये त्यांचे दीपक ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी टिनाचे छत आणि पीओपीचे प्लास्टर तोडून दुकानात प्रवेश केला. आतमधील शोकेस फोडून त्यातील दागिने घेऊन चोरटे पळून गेले. आज सकाळी येरपुडे दुकान उघडण्यासाठी गेले तेव्हा चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी दुकानात तोडफोड करून २८ पायपट्ट्या (पायल) आणि अन्य काही दागिने लंपास केले. हे सर्व बेन्टेक्सचे होते. सोन्याचे समजून चोरट्यांनी ते चोरून नेले. प्रत्यक्षात दुकानात सोन्याचेही दागिने होते. मात्र, चोरट्यांना ते गवसले नाही. त्यामुळे येरपुडे यांचे मोठे नुकसान टळले. चोरीला गेलेल्या बेन्टेक्सच्या दागिन्यांची किंमत २३ हजार रुपये असल्याचे समजते. अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले. चोरट्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)