सराफा दुकान फोडले
By Admin | Updated: June 19, 2014 01:04 IST2014-06-19T01:04:05+5:302014-06-19T01:04:05+5:30
छत आणि पीओपीचे प्लास्टर तोडून चोरटे अजनीतील एका सराफा दुकानात शिरले. आतमध्ये तोडफोड करून त्यांनी बेन्टेक्सचे दागिने चोरून नेले. सुदैवाने चोरट्यांना सोन्याचे दागिने गवसले नाही.

सराफा दुकान फोडले
अजनीतील घटना : बेन्टेक्सचे दागिने लंपास, सोने वाचले
नागपूर : छत आणि पीओपीचे प्लास्टर तोडून चोरटे अजनीतील एका सराफा दुकानात शिरले. आतमध्ये तोडफोड करून त्यांनी बेन्टेक्सचे दागिने चोरून नेले. सुदैवाने चोरट्यांना सोन्याचे दागिने गवसले नाही. त्यामुळे सराफाचे मोठे नुकसान टळले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
राजू रामभाऊ येरपुडे हे अजनीतील अंबाशिवशक्तीनगरात राहतात. भगवाननगरमध्ये त्यांचे दीपक ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी टिनाचे छत आणि पीओपीचे प्लास्टर तोडून दुकानात प्रवेश केला. आतमधील शोकेस फोडून त्यातील दागिने घेऊन चोरटे पळून गेले. आज सकाळी येरपुडे दुकान उघडण्यासाठी गेले तेव्हा चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी दुकानात तोडफोड करून २८ पायपट्ट्या (पायल) आणि अन्य काही दागिने लंपास केले. हे सर्व बेन्टेक्सचे होते. सोन्याचे समजून चोरट्यांनी ते चोरून नेले. प्रत्यक्षात दुकानात सोन्याचेही दागिने होते. मात्र, चोरट्यांना ते गवसले नाही. त्यामुळे येरपुडे यांचे मोठे नुकसान टळले. चोरीला गेलेल्या बेन्टेक्सच्या दागिन्यांची किंमत २३ हजार रुपये असल्याचे समजते. अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले. चोरट्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)