बलम तू...देसी मुसामी...प्राजक्ताच्या गाण्यांची ‘धमाल’

By Admin | Updated: June 1, 2015 02:46 IST2015-06-01T02:46:37+5:302015-06-01T02:46:37+5:30

डीजेच्या तालावर गुणी गायिका प्राजक्ता मानकरच्या सुरेल गाण्यांनी ‘धमाल गल्ली’ला प्रारंभ करण्यात आला.

Bullam Tu ... Desi Musami ... Prajakta Songs 'Dhamal' | बलम तू...देसी मुसामी...प्राजक्ताच्या गाण्यांची ‘धमाल’

बलम तू...देसी मुसामी...प्राजक्ताच्या गाण्यांची ‘धमाल’

डीजेच्या तालावर गुणी गायिका प्राजक्ता मानकरच्या सुरेल गाण्यांनी ‘धमाल गल्ली’ला प्रारंभ करण्यात आला. आर. जे. राजन यांनीही आपल्या खास अंदाजात तरुणाईला बांधून ठेवले. डान्स मॅडनेस क्लबचे इन्स्ट्रक्टर माधव वैद्य यांनी झुंबा डान्सच्या माध्यमातून फिटनेसचे प्रात्यक्षिके दाखवित ते करवूनही घेतले.
कसरत अन् छंद
‘ड्रोन’ची कसरत, गिटारवादन, अंगाभोवती रिंग फिरविणे, एक टप्पा क्रि केट, सेल्फीचा आनंद, क्ले-आर्ट, भोवरा, कंचे असे एक ना अनेक खेळ, उपक्र म उपस्थितांना छंद पाहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाले. आज उत्साहाच्या भरात काही युवकांनी तर कमालच केली. ड्रोनवर उंच असलेल्या चक्क क्रॉसबारवर दोरीच्या साहाय्याने जात उंचावर दंड मारण्याचा प्रकार युवकांनी केला. त्यांच्या या साहसाला उपस्थितांनीही दाद दिली. उड्या, मस्ती, डान्सने धमाल गल्ली रंगली. प्रामुख्याने माधुरी चौरसिया यांच्या मेंदीच्या कलात्मकतेवर युवती, महिला खूश झाल्या. अनेकींची हातावर मेंदी काढून घेण्यासाठी धडपड अखेरपर्यंत सुरू होती.
बलून उडविणाऱ्या पिचकाऱ्या,
एअर बलूनला मागणी
धमाल गल्लीत असंख्य नागरिक आपल्या चिमुकल्यांना घेऊन आले होते. त्यामुळे बालकांचा कल पाहून बलून हवेत उडविणाऱ्या पिचकाऱ्या आणि हवेत उडणारे फुगे विक्रेत्यांनी उपलब्ध करून दिले होते. असंख्य बालक ही पिचकारी आणि हवेत उडणारे फुगे घेऊन मागण्यासाठी आपल्या पालकांकडे हट्ट करताना दिसले.
गेट नाऊ डॉट अ‍ॅटने आणली रंगत
धमाल गल्लीत गेट नाऊ डॉट अ‍ॅट या कंपनीने चांगलीच रंगत आणली कंपनीने धमाल गल्लीत उपस्थितांसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले होते. यात कंपनीच्या कुपनवर आवश्यक ती माहिती भरून बॉक्समध्ये टाकावयाची होती. त्यानंतर लकी ड्रॉ काढून पहिले पारितोषिक नयासाचा बाथसेट, दुसरे पारितोषिक बजान आयरन आणि तिसरे पारितोषिक सॅनडिस्कचा पेनड्राईव्ह देण्यात येणार आहे. कंपनीने एका ट्रॉलीरेसचे आयोजन केले होते. यात मैदानावर विविध ठिकाणी कंपनीचे प्रोडक्ट ठेवले होते. स्पर्धकांना ट्रॉली घेऊन त्या ठिकाणी जाऊन सर्व प्रोडक्ट जमा करायचे होते. सर्वात आधी प्रोडक्ट घेऊन येणाऱ्या १० स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मेकअप अन् मेहंदीसाठी गर्दी
धमाल गल्लीत मधु ब्युटी पार्लरच्या माधुरी चौरसिया यांनी महिला आणि युवतींना नि:शुल्क हेअर स्टाईल अन् मेहंदी काढून दिली. यामुळे त्यांच्या स्टॉलवर महिला आणि युवतींनी एकच गर्दी केली होती. अनेक महिलांनी आपली हेअर स्टाईल सेट करून घेतली. सुषमा भुरे आणि सुनिता सावडिया यांनी शेकडो महिला, युवतींच्या हातावर नक्षीदार मेहंदी काढली.

Web Title: Bullam Tu ... Desi Musami ... Prajakta Songs 'Dhamal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.