शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

जलसमृृद्धीचा बुलडाणा पॅटर्न देशात लागू व्हावा - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 07:24 IST

जलसमृद्धीचा बुलडाणा पॅटर्न संपूर्ण देशात लागू झाल्यास पाण्याचे दुर्भिक्ष्य कुठेही दिसणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि सिंचनाच्या सोयी वाढल्याने शेतकरी समृद्धी होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

नागपूर : जलसमृद्धीचा बुलडाणा पॅटर्न संपूर्ण देशात लागू झाल्यास पाण्याचे दुर्भिक्ष्य कुठेही दिसणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि सिंचनाच्या सोयी वाढल्याने शेतकरी समृद्धी होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. असे काम काटोल मार्गावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकल्पाच्या सादरीकरणाची पुस्तिका ‘जनसमृद्धी गाथा’चे प्रकाशन करण्यात आले.अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये गडकरी म्हणाले, बुलडाणा पॅटर्नची विशेषता म्हणजे राष्ट्रीय महामार्गालगत अस्तित्वात असलेले गाव तलाव, पाझर तलाव, नदी, नाला पात्र, शेततळे अशा जलस्रोतांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यातून प्राप्त माती, मुरुम राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यात आला. ४९१ किमीच्या महामार्गावर १२ मोठे जलस्रोताचे प्रकल्प राबविण्यात आले.या कामासाठी राज्य शासनाला १८७ कोटींचा खर्च अपेक्षित होता. पण हे काम महामार्ग विकासासोबतच विनाखर्च तत्त्वावर जलसंवर्धन असा दुहेरी उपक्रम यातून साध्य झाला. या उपक्रमामुळे महामार्गाच्या परिसरात समृद्ध असे भूपृष्ठीय जलसाठे तसेच पुनर्भरण प्रक्रियेतून शेकडो समृद्ध जलसाठे निर्माण झाल्याचे गडकरी यांनी सांगितले.गडकरी म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. १५२ गावात जलसमृद्धी आली असून, जवळपास ५ लाख लोकांना फायदा झाला आहे. २२,८०० विहिरींचे पुनर्भरण झाले आहे. सिंचन क्षेत्रात १५२८ हेक्टर्सने वाढ झाली आहे.जिल्हा टँकरमुक्त झालासर्वत्र पाण्याचा साठा वाढला आहे. जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. संरक्षित सिंचनाचा लाभ भूजलाच्या ११ सहस्र घनमीटर साठ्याला गृहित धरल्यास सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे. या कामासाठी बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोलाची मदत केली. पण दुष्काळग्रस्त वाशीमच्या जिल्हाधिकाºयांनी या कामासाठी नकार दिल्याने ही कामे त्या जिल्ह्यात होऊ शकली नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीbuldhanaबुलडाणा