SSC Result 2020; अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा अव्वल; निकालात मुलीच आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:06 IST2020-07-29T17:05:42+5:302020-07-29T17:06:00+5:30
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा आघाडीवर आहे.

SSC Result 2020; अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा अव्वल; निकालात मुलीच आघाडीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा आघाडीवर आहे. अमरावती विभागात बारावीचा एकूण ९५.१४ टक्के निकाल जाहीर झाला आहे. यात मुले ९३.७२ तर, मुली ९६.७६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदाही निकालात मुलीच आघाडीवर आहेत. गतवर्षी दहावीचा निकाल ७१.९८ टक्के लागला होता. यंदा निकालात २३.१६ टक्क्यांनी उच्चांक घेतला आहे.
आर्वी येथील विद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूलची ऋतुजा विलास दाऊतपुरे ही ९८.६० टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम आली आहे. यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९२.१० टक्के लागला आहे.
विभागात इयत्ता दहावीसाठी १,६८,६०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,६७,४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १,५९,३१३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात मुले ८३८५९, मुली ७५४५४ उत्तीर्ण झाल्या आहेत. विभागात ७१३ केंद्रावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्यात. अकोला ९५.५२ टक्के, अमरावती ९३.९४ टक्के, बुलडाणा ९६.१० टक्के, यवतमाळ ९४.६३ टक्के आणि वाशिम जिल्हा ९६.०९ टक्के निकाल जाहीर झाला आहे.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्याचा सरासरी निकाल ९३.८४ टक्के लागला असून यामध्ये सर्वात कमी निकाल वर्धा जिल्ह्याचा लागला आहे. यावर्षी वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील २८९ शाळांमधून १६ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी १६ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १५ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विशेष गेल्यावर्षीच्या तुलनेत यावषीर्चा निकाल तब्बल २५.१० टक्क्यांनी वाढला आहे.