शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

किंग्सवे हॉस्पिटलची इमारत असुरक्षित : आगीमुळे पिलरला नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:58 IST

फोम, फर्निचरला लागलेल्या आगीमुळे कस्तूरचंद पार्कसमोर निर्माणाधीन किंग्सवे हॉस्पिटलच्या बहुमजली इमारतीच्या पिलरचे नुकसान झाले आहे. फोम जळल्यामुळे इमारतीत उष्णतेचे प्रमाण जास्त निर्माण झाले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यास जवळपास दीड तास लागला होता. आगीमुळे पिलराच्या आतील सळाखींला हानी पोहोचली असून त्या कमजोर झाल्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत इमारत नेहमीसाठी असुरक्षित असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देअतिरिक्त माळ्यांना मंजूरी देणे घातक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फोम, फर्निचरला लागलेल्या आगीमुळे कस्तूरचंद पार्कसमोर निर्माणाधीन किंग्सवे हॉस्पिटलच्या बहुमजली इमारतीच्या पिलरचे नुकसान झाले आहे. फोम जळल्यामुळे इमारतीत उष्णतेचे प्रमाण जास्त निर्माण झाले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यास जवळपास दीड तास लागला होता. आगीमुळे पिलराच्या आतील सळाखींला हानी पोहोचली असून त्या कमजोर झाल्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत इमारत नेहमीसाठी असुरक्षित असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.ग्रेट नाग रोड येथील लोखंडे यांच्या इमारतीत काही वर्षांपूर्वी आग लागली होती. आग इमारतीच्या तळमाळ्यावर साठवून ठेवलेल्या प्लास्टिमुळे लागली होती. आगीत पिलरच्या आतील सळाखी गरम होऊन कमजोर झाल्या होत्या. आग विझविल्यानंतर संपूर्ण इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली होती. या घटनेत एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यासह काही लोकांना जीव गमवावा लागला होता. तसे पाहिल्यास किंग्सवे हॉस्पिटलची आग भीषण होती. फोमच्या आगीमुळे हॉस्पिटलच्या इमारतींच्या पिलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कोणत्याही इमारतीचा पायवा पिलरच्या आधारावर निश्चित होतो. या इमारतीच्या दुसºया आणि तिसºया माळ्यावर आग लागली होती. आगीमुळे पायव्याच्या पिलरला नुकसान झाले नाही, पण दुसºया आणि तिसºया माळ्यावरील पिलरच्या आतील सळाखी पिघळल्याची शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत चौथ्या माळ्यावरील इमारतीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. जर इमारत कोसळली तर संपूर्ण इमारतीला नुकसान होऊ शकते.उपरोक्त शक्यता पाहता मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नगररचना विभाग आणि शहर अभियंत्याला नुकसानीची माहिती दिली आहे. इमारतीच्या बाजूला बँक आणि आयुर्विमा कार्यालय आहे. येथे नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. अशा स्थितीत इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट तात्काळ करणे आवश्यक आहे.मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, आगीमुळे इमारतीचे नुकसान झाले आहे. त्याचे आकलन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे पत्र लिहिण्यात आले आहे. नगररचना आणि शहर अभियंते संपूर्ण इमारतीची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे आकलन करणार आहेत.अतिरिक्त बांधकामाला मंजूरी देणे घातककिंग्सवे हॉस्पिटलच्या इमारतीला ग्राऊंड प्लस सहा माळ्यांना मंजूरी देण्यात आली आहे. पण त्यापेक्षा जास्त मजले तयार करण्यात आले आहेत. इमारतीचा संशोधित नकाशा अग्निशमन विभाग आणि नगररचना विभागाकडे पाठविला आहे. आगीमुळे पिलरचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत अतिरिक्त बांधकामाला मंजूरी देणे घातकच ठरणार आहे.

 

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटल