शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बिल्डर व साथीदारांनी ६० लाखांची मालमत्ता हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:26 IST

मानसिक अवस्था चांगली नसलेल्या व्यक्तीला पळवून नेऊन त्याची मालमत्ता एका बिल्डर आणि साथीदारांनी परस्पर विकली. त्यातून आलेली ६० लाखांची रोकड स्वत:च्या खात्यात जमा करून ती गिळंकृत केली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली.

ठळक मुद्देमहिलेची तक्रार : अंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानसिक अवस्था चांगली नसलेल्या व्यक्तीला पळवून नेऊन त्याची मालमत्ता एका बिल्डर आणि साथीदारांनी परस्पर विकली. त्यातून आलेली ६० लाखांची रोकड स्वत:च्या खात्यात जमा करून ती गिळंकृत केली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली.जितेन्द्र चव्हाण, रविकांत बोपचे, दशरथ जोगी, विवेक वाटेकर, मुकेश वाघ अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. चव्हाण आणि बोपचे हे दोघे बिल्डर असून, जोगी चव्हाणचा मामा आहे. तर, वाटेकर आणि वाघ या बनवाबनवीत साक्षीदार म्हणून उभे झाले होते.अंबाझरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूनम राहुल वासनिक (वय ३२, रा. अंबाझरी लेआऊट) यांचे पती राहुल वासनिक यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याने २००८ पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची मोक्याच्या ठिकाणी मालमत्ता असल्याचे पाहून बिल्डर चव्हाण आणि साथीदारांनी ती हडपण्याचा कट रचला. अचानक २०१२ मध्ये राहुल वासनिक बेपत्ता झाले. त्यांची शोधाशोध केल्यानंतर पूनम यांनी पती हरविल्याची तक्रार अंबाझरी ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधाशोध केली. जुलै २०१७ मध्ये आरोपी बिल्डर चव्हाण आणि त्याचे साथीदार वासनिक यांची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पूनम वासनिक यांच्याकडे आले. तुमच्या पतीकडून ही मालमत्ता आम्ही विकत घेतल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे आरोपींनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने राहुल यांना पळवून नेले होते हे उघड झाले. या कालावधीत त्यांना आपल्या ताब्यात ठेवून त्यांच्या नावे असलेल्या घराचे विक्रीपत्र आपल्या नावे करून घेतले. त्याबदल्यात १० लाखांची रोकड तसेच ५० लाखांचे धनादेश वासनिक यांच्या नावाने बँकेत खाते उघडून जमा करण्यात आल्याचे दाखवण्यात येऊन ती रक्कम आरोपींनी स्वत:च्या खात्यात वळती करून घेतली. या बनवाबनवीसाठी आरोपींनी बनावट कागदपत्रेही तयार केली. पूनम यांना ती माहिती कळाल्यानंतर त्यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याची सविस्तर चौकशी करून पोलीस निरीक्षक प्रसाद सणस यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.बिल्डर गजाआडआरोपींपैकी बिल्डर चव्हाणला सोमवारी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, २०१३ मध्ये याच बिल्डरला अंबाझरी ठाण्यात कुख्यात संतोष आंबेकरने पिस्तूल लावून त्याच्याकडून खंडणी उकळली होती. तेव्हा या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडवून दिली होती.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर