बजेट प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST2021-02-05T04:48:03+5:302021-02-05T04:48:03+5:30

सरकारच्या अर्थसंकल्पात तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिराश केला आहे. सरकारने प्रत्येक सरकारी संस्थांच्या खासगीकरणाचा धडाका लावला आहे. यामुळे तरुणांचा बळी जाणार ...

Budget response | बजेट प्रतिक्रिया

बजेट प्रतिक्रिया

सरकारच्या अर्थसंकल्पात तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिराश केला आहे. सरकारने प्रत्येक सरकारी संस्थांच्या खासगीकरणाचा धडाका लावला आहे. यामुळे तरुणांचा बळी जाणार आहे. रेल्वे व दाेन बँकांच्या खासगीकरणाची घाेषणा केली आहे. लाॅकडाऊनमध्ये बेराेजगार झालेल्या तरुणांसाठी काहीच तरतूद नाही. गरिबांसाठी काहीच नाही व श्रीमंत मित्र व्यापाऱ्यांना लाभ देणारा बजेट आहे. माेबाइल व चार्जरच्या किमती वाढवून ऑनलाइन शिक्षणाचाही बाेजवारा केला आहे.

- राहुल गुढे, विद्यार्थी

खासगी नाेकरदारांना दिलासा नाही

बजेटमध्ये खासगी नाेकरदारांसाठी काहीच नाही. पेन्शनच्या याेजनेबाबत काही व्यवस्था केली नाही. पीएफमध्येही कुठलीच मदत केली नसून कंपन्यांना मनमानी करण्याची मुभा दिली आहे. माेठ्या उद्याेजकांना भरीव मदत देण्यात येते, पण नाेकरदारांसाठी काही नाही. तरुण सरकारी नाेकरीमध्ये जाण्याची इच्छा बाळगताे, पण त्यांना छळण्यासाठी खासगीकरणाचे सत्र चालविले आहे. सरकारने अपेक्षाभंग केला आहे.

- राहुल मेश्राम, खासगी नाेकरदार

Web Title: Budget response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.