विकासाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:08+5:302021-02-05T04:44:08+5:30
- अजय संचेती, माजी खासदार, राज्यसभा नागपूरसह विदर्भाला लाभ देणारा अर्थसंकल्प नागपूर मेट्रोसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली ...

विकासाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प
- अजय संचेती, माजी खासदार, राज्यसभा
नागपूरसह विदर्भाला लाभ देणारा अर्थसंकल्प
नागपूर मेट्रोसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या चारही बाजूने मेट्रोचा विस्तार लवकर होणार आहे. याशिवाय पायाभूत सुविधांसाठी ऐतिहासिक तरतूद झाल्याने त्याचा फायदा निश्चितपणे नागपूरसह विदर्भालादेखील मिळेल. वीज कंपनी निवडण्याची ग्राहकांना मुभा, मेक इन इंडिया उत्पादनांच्या वापरासाठी ठोस उपाययोजना, शेतकऱ्यांसाठी मोठ्या तरतुदी या सर्व गोष्टी सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायक आहे. एकंदरीत आत्मनिर्भर भारत या घोषवाक्याला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे.
- कृष्णा खोपडे, आमदार, भाजप
मेट्रो विस्तारासाठी अभिनंदन, पण अर्थसंकल्प निराशाजनक
रामटेक मतदार संघात नागपूर मेट्रो फेज २ ला मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा होणार आहे. त्यासाठी सरकारचे अभिनंदन. मात्र संपूर्ण बजेटचा अभ्यास केल्यास हे बजेट निराशाजनक आहे. आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीला समोर ठेवून अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेला निराश करणारा हा अर्थसंकल्प आहे.
- कृपाल तुमाने, खासदार, रामटेक
नागपूरसाठी ऐतिहासिक अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थसंकल्पात नागपूरला भरभरून मिळाले. मेट्रो वेगाने विकसित होईल. रोजगार निर्मिती होईल. परवडणाऱ्या घरासाठीच्या निर्णयाने सामान्यांना फायदा होईल. हमीभावाच्या दृष्टीने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. मोठ्या शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरसारख्या शहराला फायदाच होईल. कोरोनासारख्या वाईट काळात हा चांगला अर्थसंकल्प आहे.
- प्रवीण दटके, आमदार, विधान परिषद