किचनचे बजेट बिघडलेलेच

By Admin | Updated: July 11, 2014 01:27 IST2014-07-11T01:27:58+5:302014-07-11T01:27:58+5:30

महागाईमुळे बिघडलेले घरातील किचनचे बजेट सावरण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या महिलांनी या अर्थसंकल्पातून दिलासा न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. अच्छे दिन कब आयेंगे,

The budget of the kitchen is spoiled | किचनचे बजेट बिघडलेलेच

किचनचे बजेट बिघडलेलेच

सुरक्षेची पावले उत्तम : विशेष धोरणांचा अभाव
नागपूर : महागाईमुळे बिघडलेले घरातील किचनचे बजेट सावरण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या महिलांनी या अर्थसंकल्पातून दिलासा न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. अच्छे दिन कब आयेंगे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत त्यांनी त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली. मोदी सरकारने गुरुवारी पहिला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला. या संदर्भात सर्वसामान्य महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांना ध्यानात ठेवून अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली. मात्र महागाईपासून गोरगरिबांना दिलासा मिळेल, अशा तरतुदींचा अभाव अर्थसंकल्पात आहे. डिझेल आणि घरगुती गॅस महाग होण्याचे संकेत मिळाल्याने गृहिणींवर ताण आणखी वाढणार आहे. १०० कोटींची तरतूद करून महिलांच्या सुरक्षेकडे सरकारने लक्ष दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात गृहिणींना तत्काळ दिलासा देणाऱ्या अशा कुठल्याही योजनांचा समावेश नसल्याने किचनचे बजेट बिघडलेलेच असल्याची प्रतिक्रिया महिलांनी लोकमतशी बोलताना दिली. (पान २ वर)
महागाई कमी करा
महागाईवर नियंत्रण येण्याची अपेक्षा गृहिणींना आहे. पण तसे होणार नाही. जागतिक स्पर्धेचे कारण पुढे करून जेटली यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. गॅस वाढीचे संकेत दिल्याचे बजेट बिघडणार आहे. याशिवाय आयकराची मर्यादा वाढल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. नोकरदारांसाठी बजेट चांगले आहे.
ममता वैरागडे, नोकरदार.
किचन समस्या ‘जैसे थे’
यंदाच्या अर्थसंकल्पात गृहिणींच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. स्वयंपाकघराचे बजेट वर्षभरापासून वाढलेले आहे. बचत करणे शक्य नाही. अर्थसंकल्पापासून गृहिणींना काहीही घेणेदेणे नसते. शैक्षणिक आणि आरोग्यासाठी काही दिलासा देणाऱ्या योजना मध्यमवर्गीयांसाठी हव्या होत्या. करमर्यादेमुळे दिलासा मिळाला.
सुमती चव्हाण, गृहिणी.
सौंदर्यप्रसाधने स्वस्त करा
सध्या पुरुषांच्या बरोबरीने महिलाही स्वयंरोजगार करीत आहेत. ब्यूटी पार्लर व्यवसायात अनेक महिला असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात या व्यवसायाशी संबंधित उत्पादनांवर सूट हवी होती. त्याचा मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला असता. वस्तू महागल्याने सेवा महाग होईल. कल्पना जैन, सौंदर्यतज्ज्ञ.

Web Title: The budget of the kitchen is spoiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.