शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

Budget 2019 : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला ३५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:30 AM

वित्त आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेचे जाळे मजबूत बनविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी मिळाला आहे. यात महत्त्वाच्या २७० किलोमिटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे लाईनसाठी २०१९-२० साठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गाला गती देण्यासाठी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच दरवर्षी या प्रकल्पासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात येत असून या अर्थसंकल्पातही ३५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविदर्भातील प्रकल्पांना भरघोस निधी : बडनेरा वर्कशॉपसाठी १५१.६३ कोटीची तरतूद

दयानंद पाईकराव/आनंद शर्मा/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वित्त आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेचे जाळे मजबूत बनविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी मिळाला आहे. यात महत्त्वाच्या २७० किलोमिटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे लाईनसाठी २०१९-२० साठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गाला गती देण्यासाठी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच दरवर्षी या प्रकल्पासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात येत असून या अर्थसंकल्पातही ३५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड या प्रकल्पाशिवाय बडनेरातील रेल्वे वर्कशॉपसाठी १५१ कोटी ६३ लाख ७२ हजार रुपये देण्यात आले आहेत. ७८.७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-नागपूर चौथ्या लाईनसाठी १३५ कोटी रुपये, ७६.३ किलोमीटर लांबीच्या वर्धा-नागपूर थर्ड लाईनसाठी ११० कोटी, १३२ किलोमीटर लांबीच्या वर्धा-बल्लारशाह थर्ड लाईनसाठी १६० कोटी रुपये, इटारसी-नागपूर थर्ड लाईनसाठी १८५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात अमरावती रेल्वेस्थानकावर नवी टर्मिनल इमारत तयार करण्याची घोषणा करण्यात आली असून प्राथमिक स्तरावर त्यासाठी केवळ एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर १६५ किलोमीटर लांबीच्या राजनांदगाव-नागपूर थर्ड लाईनच्या कामासाठी ३५० कोटी रुपये, १४९.५२ किलोमीटर लांबीच्या छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईनसाठी १२५ कोटी रुपये मिळाले आहेत. ४९.५ किलोमीटर लांबीच्या वडसा-गडचिरोली रेल्वेलाईनसाठी २९.९० कोटी रुपये देण्यात आले आहे. गोंदिया-जबलपूर (बालाघाट, कटंगीसह) रेल्वे लाईनसाठी १२५ कोटी रुपये, छिंदवाडा-मंडला फोर्ट रेल्वे लाईनसाठी १५० कोटी रुपये, गोंदिया येथील डेमू शेडसाठी १.१६ कोटी, वर्धा रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्मवर वॉशेबल अ‍ॅप्रानसाठी ५० लाख रुपये, तिगाव-चिचोंडा थर्ड घाट लाईनसाठी ३५ कोटी रुपये, वर्धा-चितोडा सेकंड कॉर्ड लाईनसाठी १ कोटी रुपये, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ५० रेल्वे गेटवर रिमोट टर्मिनल व ईएलडी इक्विपमेंट सिस्टीमसाठी ४ कोटी रुपये, १५ रेल्वे गेटवर इंटरलॉकिंगसाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019railwayरेल्वे