शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प-२०१९ :  नागपुरात  ‘एम्स’, ‘मेट्रो’सह ‘हाऊसिंग’ला मिळणार ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:57 IST

केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदींमुळे उपराजधानीच्या विकास ‘एक्स्प्रेस’चा वेग आणखी वाढणार आहे. अर्थसंकल्पातील घोषणा व विविध योजनांसाठी केलेल्या तरतुदींमुळे ‘एम्स’च्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय ‘मेट्रो’च्या बांधकामालादेखील गती येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील ‘हाऊसिंग’ क्षेत्राला नवीन उभारी मिळण्याची आशा वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे‘एम्स’च्या ५० जागा वाढणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदींमुळे उपराजधानीच्या विकास ‘एक्स्प्रेस’चा वेग आणखी वाढणार आहे. अर्थसंकल्पातील घोषणा व विविध योजनांसाठी केलेल्या तरतुदींमुळे ‘एम्स’च्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय ‘मेट्रो’च्या बांधकामालादेखील गती येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील ‘हाऊसिंग’ क्षेत्राला नवीन उभारी मिळण्याची आशा वर्तविण्यात येत आहे.मागील काही वर्षांपासून वैद्यकीय हब म्हणून नागपूरची देशभरात ओळख निर्माण झाली आहे. शहरात ‘एम्स’ आल्यानंतर तर आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. मिहानमधील २०० एकर परिसरात ‘एम्स’चे बांधकाम होत आहे. स्वत:ची इमारत नसल्याने ‘एम्स’ एमबीबीएसचे वर्ग मेडिकल कॉलेजमध्ये सप्टेंबर २०१८ पासून सुरू झाले. पहिले वर्ष व अपुऱ्या जागेमुळे एमबीबीएसच्या ५० जागेवरच प्रवेश देण्यात आले. मात्र २०१९-२० या वर्षात ‘एम्स’च्या आणखी ५० जागा वाढविण्यात येणार आहे. देशभरातील १४ ‘एम्स’मधील हजार जागा वाढणार आहेत. यात नागपूर व गुंटूर येथील प्रत्येकी ५० जागांचा समावेश आहे.याशिवाय अर्थसंकल्पात विविध ‘मेट्रो’ योजनांसाठी १९ हजार १५२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर ‘मेट्रो’चे काम सुरू असून या तरतुदीमुळे नागपूर मेट्रोच्या कामाला आणखी गती मिळण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे देशभरातील ‘मेट्रो’च्या जाळ्याचा विस्तार करण्यावर सरकारचा भर आहे.‘हाऊसिंग’मधील मंदी हटणारमागील काही काळापासून उपराजधानीतील बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण होते. शहरातील अनेक फ्लॅट्स व ‘स्कीम्स’ तयार होऊनदेखील रिकामे आहेत. मात्र केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घरासंदर्भात केलेल्या घोषणेमुळे हे चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अर्थंसंकल्पातील तरतुदी व घोषणेनुसार घरखरेदी स्वस्त होणार आहे. सध्या गृह कर्जावर २ लाखांची सवलत मिळते. या सवलतीत आता दीड लाखांची भर पडणार आहे. ४५ लाखांपर्यंत घर खरेदीवर व्याजामध्ये साडेतीन लाखांची सूट मिळणार आहे. यामुळे शहरातील रिकाम्या फ्लॅट्सला खरेदी करण्यासाठी लोक समोर येतील, अशी अपेक्षा गृहनिर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Metroमेट्रो