शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा आवश्यक  : सी.एल. थूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 22:58 IST

देशात समान नागरी कायदा असावा. परंतु जोपर्यंत संविधानानुसार समान नागरी कायदा होत नाही, तोपर्यंत प्रत्येक धर्मियांना त्यांच्या चालीरिती व रीतीरिवाज पाळण्याचे अधिकार असावे. त्यामुळे बौद्धांच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा आवश्यक आहे, असे प्रतिपादन अनुसूचित जाती जमाती समितीचे सदस्य आणि राज्य शासनाने गठित केलेल्या बौद्ध विवाह कायदा प्रारूप समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल यांनी येथे केले.

ठळक मुद्दे दीक्षाभूमीवर सामाजिक न्यायमंत्री बडोले यांना कायद्याचे प्रारूप हस्तांतरित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात समान नागरी कायदा असावा. परंतु जोपर्यंत संविधानानुसार समान नागरी कायदा होत नाही, तोपर्यंत प्रत्येक धर्मियांना त्यांच्या चालीरिती व रीतीरिवाज पाळण्याचे अधिकार असावे. त्यामुळे बौद्धांच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा आवश्यक आहे, असे प्रतिपादन अनुसूचित जाती जमाती समितीचे सदस्य आणि राज्य शासनाने गठित केलेल्या बौद्ध विवाह कायदा प्रारूप समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल यांनी येथे केले.या समितीने तयार केलेल्या बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप शनिवारी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना हस्तांतरित करण्यात आले. लॉर्ड बुद्धा टीव्ही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीवर आयोजित या प्रारूप हस्तांतरण सोहळ्याला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, प्रारूप समितीचे सदस्य आ. डॉ. मिलिंद माने, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समितीचे सदस्य अ‍ॅड. दिलीप काकडे , बबन कांबळे, भय्याजी खैरकर, विजय कांबळे, डी. आर. महाजन, अ‍ॅड. अविनाश बनकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एल.आर. सुटे, भंते हर्षदीप आदी उपस्थित होते.सी.एल. थूल यांनी बौद्ध विवाह कायदा तयार करण्यामागची भूमिका विषद करीत यासाठी सुरुवातीपासून कसा पुढाकार झाला, याची माहिती दिली. बौद्ध समाजासाठी सर्वसमावेशक असे हे कायद्याचे प्रारूप तयार झाले आहे. यानंतर ते इंटरनेटवर लोकांसाठी उपलब्ध केले जाईल. लोकांच्या या संबंधात काही आक्षेप व तक्रारी असतील, ते विचारात घेऊन सुधारणा केली जाईल, त्यानंतर ते विधिमंडळात मांडण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.डॉ. मिलिंद माने, दिनेश वाघमारे, भय्याजी खैरकर, अविनाश बनकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.संचालन वामन सोमकुंवर यांनी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे समन्वयक डॉ. सिद्धार्थ गायकवाड, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे सचिन मून, मोनाल थुल, विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. सच्चिदानंद दारुंडे, शिवदास वासे, ललित खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर