बुद्धविहारे ज्ञानपीठे बनावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST2021-08-21T04:12:40+5:302021-08-21T04:12:40+5:30
भिवापूर : बुद्धविहारे हे केवळ पूजा-अर्चा करण्याचे स्थान न बनता नवीन पिढीला सुसंस्कारित शिक्षण देण्याचे केंद्र व्हावे. बुद्धविहारे ज्ञानपीठे ...

बुद्धविहारे ज्ञानपीठे बनावीत
भिवापूर : बुद्धविहारे हे केवळ पूजा-अर्चा करण्याचे स्थान न बनता नवीन पिढीला सुसंस्कारित शिक्षण देण्याचे केंद्र व्हावे. बुद्धविहारे ज्ञानपीठे बनावीत, असे प्रतिपादन भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांनी केले. ते मालेवाडा येथे नवीन बुद्धविहाराच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
आ. राजू पारवे, पं. स. सदस्य राहुल मसराम, सरपंच विष्णू कोडापे, उपसरपंच प्रशांत इंगोले, अशोक ठाकरे, भंते धम्मज्योती, भंते राजरत्न आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून विहारातील बुद्ध मूर्तीचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक व संचालन मनोहर वानखेडे यांनी तर आभार चेतन शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शीतल सवाईमुन, दिनेश लोणारे, गोवर्धन शिंगाडे, नथ्थू गजघाटे, चंद्रशेखर वानखेडे, राजू लोणारे, शकुंतला मुन, साधना गणवीर, प्रीती मेश्राम, सुशीला खोब्रागडे, गौतम झोडापे, राज सवाईमुन, प्रियंका बावनगडे, रमेश राऊत, सुधाकर मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.
200821\195-img-20210820-wa0056.jpg
भदंत ज्ञानज्योती महाथेरो मार्गदर्शन करतांना