शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

बुद्धांचा शांतीचा संदेशच सर्व जगासाठी मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:02 IST

तथागत गौतम बुद्ध यांच्या शांती व अहिंसा या मार्गाचाच सर्व जगाने स्वीकार केला असून, त्यांचा विश्वशांतीचा संदेश हा जगासाठी मार्गदर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.

ठळक मुद्देरामदास आठवले : आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेला सुरुवातदेश-विदेशातील प्रतिनिधींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या शांती व अहिंसा या मार्गाचाच सर्व जगाने स्वीकार केला असून, त्यांचा विश्वशांतीचा संदेश हा जगासाठी मार्गदर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था (बार्टी) व समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वैशाख दिन (बौद्ध पौर्णिमानिमित्त) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय शांती व समता’ परिषदेचे शनिवारी थाटात उद्घाटन पार पडले. उद्घाटन सत्राप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर, रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. डॉ. मिलिंद माने, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ कराड, गिरीश गांधी, माजी कुलगुरू एस. एन. पठाण, अब्दुल फलाही, आचार्य लोकेश मुनी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, थायलंड, भूतान, फिलिपाईन्स, लडाख तसेच लंडन येथील भंते व विद्वान उपस्थित होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सर्वांचे स्वागत करण्यात आले.नागपूर ही ऐतिहासिक भूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी पवित्र दीक्षाभूमीत बौद्ध धमाची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांना दिली. देश-विदेशातील बुद्धिस्ट विचारवंत तसेच शांततेचा पुरस्कार करणारे सर्वधर्मीय धर्मगुरू, तत्त्ववेत्ते या नागपूर नगरीमध्ये आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेच्या माध्यमातून एकत्र आले, ही बाब अभिमानास्पद असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. महादेव जानकर, खा. कृपाल तुमाने, विश्वनाथ कराड, आचार्य लोकेश मुनी, सुलेखा कुंभारे यांनीही विचार व्यक्त केले.बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या अनुसरणाने जगभर प्रज्ञा, शील व करुणा यांचा संदेश पोहचेल, अशी आशा प्रास्ताविकपर भाषणात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली. संचालन शैलजा शेलगावकर व धर्मेश धवनकर यांनी केले. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी आभार मानले.मुख्यमंत्र्यांनी साधला‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंंग’द्वारे संवादमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी नागपूर शहराची निवड केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. जगात अराजकता व अशांततेचे वातावरण असताना बुद्धाच्या धम्मक्रांतीने प्रस्थापित झालेली शांती व समता या परिषदेद्वारे जगभर पसरेल, असे आपल्या संदेशात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.आठवलेंच्या भाषणप्रसंगी नारेबाजीया परिषदेबाबत काही आंबेडकरी संघटनांनी आक्षेप घेतला होता. ही परिषद भाजपा-व आरएसएसप्रणीत असल्याने त्याला आमचा विरोध असल्याचे पत्रही विभागाला पाठवले होते. त्याचे पडसाद उद्घाटनप्रसंगी दिसून आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे भाषणासाठी उभे राहताच नाटककार व आंबेडकरी कार्यकर्ते संजय जीवने आणि काही कार्यकर्ते उठून उभे झाले आणि त्यांनी नारेबाजी करायला सुरुवात केली. ही परिषद भाजपा-आरएसएसप्रणीत असल्याने त्याचा निषेध असो. आठवले मुर्दाबाद असे नारे दिले. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना पकडून बाहेर नेले. ‘मुर्दाबाद करणारे जसे असतात तसे जिंदाबाद करणारेही आहेतच, आपण विरोध करा मी पुढे जातो, असे सांगत आठवले यांनी आपल्या शैलीत विरोध करणाऱ्यांची फिरकी घेतली; नंतर आठवले यांचे भाषण सुरळीत पार पडल्यानंतर भंते ज्ञानज्योती यांनी माईकवर येऊन परिषदेबाबत निषेध व्यक्त केला. या विरोधामुळेच डॉ. सुखदेवराव थोरातही कार्यक्रमाला आले नाहीत. 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर