बुद्ध जयंतीही घरीच साजरी होणार :बौद्धबांधवांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:18 PM2020-05-06T19:18:05+5:302020-05-06T19:21:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्याप्रमाणे साधेपणाने पण उत्साहात घरोघरी साजरी करण्यात आली. ...

Buddha Jayanti will also be celebrated at home: Resolution of Buddhists | बुद्ध जयंतीही घरीच साजरी होणार :बौद्धबांधवांचा संकल्प

बुद्ध जयंतीही घरीच साजरी होणार :बौद्धबांधवांचा संकल्प

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्याप्रमाणे साधेपणाने पण उत्साहात घरोघरी साजरी करण्यात आली. कुणीही
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले नाही. त्याच धर्तीवर उद्या ७ मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या पावनपर्वावर बुद्ध जयंतीसुद्धा आपापल्या घरीच साधेपणाने पण उत्साहात साजरी करण्याचा संकल्प बौद्धबांधवांनी घेतला आहे. अनेकांनी बुद्ध जयंतीनिमित्त फेसबुक, सोशल मीडियावर आॅनलाईन कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे.

ड्रॅगन पॅलेसमध्ये सार्वजनिक बुद्ध जयंती नाही
वैशाख पौर्णिमेच्या पावनपर्वावर उद्या ७ मे रोजी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे सकाळी १० वाजता विशेष बुद्धवंदना घेण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ड्रॅगन पॅलेस येथे सार्वजनिक बुद्ध जयंती साजरी होणार नाही. नागरिकांसाठी प्रवेश बंद राहील. त्यामुळे बौद्ध उपासक-उपासिकांनी आपापल्या घरीच बुद्ध जयंती साजरी करावी, असे आवाहन टेम्पलच्या प्रमुख अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी केले आहे. कोरोनाच्या संकटात ड्रॅगन पॅलेस टेम्पलतर्फे एक लाख मास्क नि:शुल्क वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला होता. ते लक्ष्य पूर्ण करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘बुद्ध पहाट’ फेसबुक, यूट्यूबवर लाईव्ह
गेल्या चार वर्षांपासून उत्तर नागपुरातील बुद्धनगर मैदानात हजारोंच्या उपस्थितीत होणारी ‘बुद्ध पहाट’ यंदा पाचव्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे आॅनलाईन लाईव्ह करण्यात येत आहे. या आयोजनात खंड पडू नये यासाठी यावर्षी फेसबुक व यूट्यूबवर सकाळी ७ वाजता बुद्ध पहाटचा कार्यक्रम सुरू होईल. ७ मे, गुरुवारला तथागत गौतम बुद्ध यांची २५८२ वी जयंती आहे.

प्रसिद्ध गायिका छाया वानखेडे, आकांक्षा नगरकर-देशमुख या गीते सादर करतील. तासभर चालणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध बुद्ध भीम गीते सादर करण्यात येतील. गायिका छाया वानखेडे यांच्या फेसबुक, यूट्यूबवर तसेच मैत्री इंडिया या पोर्टलवरही हा कार्यक्रम थेट बघता येईल.

Web Title: Buddha Jayanti will also be celebrated at home: Resolution of Buddhists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.