शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

'शिल्पकार जगाचा' मध्ये सादर झाली बुद्ध-भीमगीते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:20 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने आयोजित सूमधूर गीतांचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. त्यात विविध गीतांच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने आयोजित सूमधूर गीतांचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. त्यात विविध गीतांच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले.घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पर्वावर म्युझिक टाइम ऑर्केस्ट्राच्यावतीने ‘शिल्पकार जगाचा’ हा सुमधूर बुद्ध-भीम गीतमालेचा कार्यक्रम शनिवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. या कार्यक्रमाची संकल्पना सुनील गजभिये व मित्र परिवाराची होती. पार्श्वगायक डॉ. अनिल खोब्रागडे, पार्श्वगायिका धनश्री बुरबुरे यांच्यासह चंद्रपूरच्या निशा धोंगडे, श्रद्धा यादव, शिलवंत सोनटक्के, गोल्डी हुमने, मनीष राय, मनोज बहादुरे हे कलाकार बुद्ध गीते व भीम गीते सादर केली. आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक अशोक जांभुळकर यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिलवंत यांनी ‘भीमा तुला वंदना’ या गीताच्या माध्यमातून अभिवादन करीत गीत सादर केले. धनश्री यांनी ‘अमृतवाणी ही बुद्धाची’ हे गीत सादर केले. शिलवंत यांनी ‘ही पाकळी पाकळी’ तर मनीषने ‘चंदनपरी तु झिजला’हे गीत दमदारपणे सादर केले. डॉ. अनिल खोब्रागडे यांनी ‘भीमा तुझ्या पथावर’ व ’चंदन वृक्षासमान’ ही गीते सादर करून रसिकांच्या टाळ्या खेचल्या. त्यानंतर ज्योती भगत मंचावर आल्या. त्यांच्या सूत्रसंचालनात गोल्डी हमने यांनी हे गीत सादर केले. ’भिमा घे पुन्हा’ या गोल्डी व शिलवंत यांनी सादर केलेल्या गीताला वन्समोअर मिळाला. ’प्रथम नमो गौतमा’,भीमराया घे’ अशी विविध सुमधूर गीते गायकांनी यावेळी सादर केली.वृद्धाश्रम आणि सेवाश्रम चालविणाऱ्या जीवन आश्रय सेवा संस्थेच्या साहाय्यार्थ हा कार्यक्रम घेण्यात आला. संयोजन म्युझिक टाइम ऑर्केस्ट्राचे शैलेश ढोके यांचे होते तर संयोजक सुनील आर. गजभिये, शैलेश जांभुळकर, अनिल सिरसाट, बी. के. सहारे होते.

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीmusicसंगीत